esakal | World Cup 2019 : लॉर्ड्सवर तो ओरडतोय अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे

बोलून बातमी शोधा

World Cup 2019 : लॉर्ड्सवर तो ओरडतोय अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात काल चांगलीच रंगत भरली होती. या सामन्यात अनेक चाहते आपापल्या देशाला पाठींबा देत होते. अशात महाराष्ट्रातील एक पठ्ठ्या स्वतंत्र जिल्ह्यासाठी घोषणा देत होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

World Cup 2019 : लॉर्ड्सवर तो ओरडतोय अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे
sakal_logo
By
वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात काल चांगलीच रंगत भरली होती. या सामन्यात अनेक चाहते आपापल्या देशाला पाठींबा देत होते. अशात महाराष्ट्रातील एक पठ्ठ्या स्वतंत्र जिल्ह्यासाठी घोषणा देत होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या या सामन्याला भारतीय चाहत्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. अशातच महाराष्ट्रातील एक अवलिया आंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे अशा घोषणा देत होता. 

हा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

कोणाचं काय तर कोणाचं काय अंबाजोगाई जिल्हा झलाच पाहिजे

अंबाजोगाई हा बीड जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुकाच्या वेगळ्या जिल्ह्यासाठी हा पठ्ठ्या लॉर्ड्सवर घोषणा देत होता. भारतीय संघ अंतिम फेरी गाठणार या विश्वासाने अनेकांनी अंतिम फेरीची तिकीटं काढून ठेवली होती. मात्र, तसे काही झाले नाही. तरीही या सामन्याला भारतीय चाहतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.