World Cup 2019 : देव करो आणि बांगलादेशच्या संघावर वीज कोसळो!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जुलै 2019

पाकिस्तानच्या संघाला आता उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्य आहे. अशावेळी त्यांचा माजी कर्णधार महंमद युसूफने मात्र, संघाला कोणती तरी नैसर्गिक आपत्तीच वाचवी शकते असे मत व्यक्त केले आहे.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : पाकिस्तानच्या संघाला आता उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्य आहे. अशावेळी त्यांचा माजी कर्णधार महंमद युसूफने मात्र, संघाला कोणती तरी नैसर्गिक आपत्तीच वाचवी शकते असे मत व्यक्त केले आहे. 

''बांगलादेशच्या संघावर आता वीज कोसळण्याचीच गरज आहे,'' असे मत युसूफने व्यक्त केले आहे. पाकिस्तानचा सध्याचा कर्णधार सर्फराज अहमदने मात्र, आम्ही 500 धावा करु आणि सामना जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी आता त्यांना किमान 350 धावा करुन 312 धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. असे झाले तर त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळू शकतो. 

यासाठी त्यांना बांगलादेशविरुद्ध 350 धावा करुन त्यांच्या पूर्ण संघ 38 धावांत बाद करणे गरजेचे आहे. पाकने या सामन्यात प्रथमच फलंदाजी करणे गरजेचे आहे. त्यांनी दुसऱअयांदा फलंदाजी केली तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. पाकिस्तानचा संघ सध्या नऊ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We need lightning to strike Bangladesh team says Mohammad Yousuf