Welcome to Pakistan : गांगरलेल्या पाकिस्तानचा आनंद गगनात मावेना!

Pakistan Cricket Team
Pakistan Cricket TeamSakal

Australia Tour Of Pakistan : सुरक्षिततेच्या कारणास्तव पुन्हा एकदा आर्थिक फटका बसलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ऑस्ट्रेलियाने मोठा दिलासा दिला आहे. पाकिस्तान दौरा निश्चित केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने पाक दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा केली. नियमित सदस्यांना घेऊन ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दौरा करणार असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांचा आनंद गगनात मावेना असाच माहोल सध्या सोशल मीडियावर दिसून येत आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने (Australian Cricket Board) पाकिस्तान दौऱ्यासाठी संघाची घोषणा केल्यानंतर #Welcome_to_Pakistan हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिगमध्ये आला आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून पाकिस्तानमधील क्रिकेट चाहते ऑस्ट्रेलियाचे स्वागत करताना दिसत आहे. काही नेटकरी श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्याची आठवण करुन देत पाकिस्तानमध्ये खेळणं असुरक्षित असल्याचं मतही व्यक्त करत आहेत. 2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकन संघावर लाहोरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट 'नापाक' झाले. बऱ्याच वर्षानंतर क्रिकेटला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता पुन्हा पाकिस्तानमध्ये खेळणं असुरक्षित असल्याचे वातावरण क्रिकेट जगतात निर्माण होत होते.

मागील वर्षी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी पाकिस्तानमध्ये पोहचला. पण त्यांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार देत दौरा सुरु होण्याच्या आधी मायेदेशी परतण्याचा निर्णय घेतला. सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांनी ही भूमिका घेतली होती. त्यांच्या या निर्णयाचे पडदास इंग्लंडमध्येही उमटले. इंग्लंडनेही पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला. या गोष्टीमुळे पाकिस्तानला आर्थिक फटका तर बसलाच शिवाय आता पुन्हा पाकिस्तान क्रिकेट अधांतरी पडणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.

ऑस्ट्रेलियाने दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेणं आणि या दौऱ्यात प्रमुख खेळाडूंना संघात स्थान देणं ही गोष्ट पाकिस्तानसाठी खूप मोठी आहे. क्रिकेट जगतात निर्माण झालेले पाकिस्तानविरोधी वातावरण निवळण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे. त्यामुळेच #Welcome_to_Pakistan या हॅशटॅगच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि क्रिकेट बोर्डाचे आभार पाकिस्तान चाहत्यांकडून मानले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com