Chris Gayle : ख्रिस गेल अडचणीत; मुंबईच्या समुद्रात परवानगी न घेता चित्रीकरण

बेकायदा वर्तनामुळे अडचणीत
West Indies cricket player IPL commentator Chris Gayle face trouble for filming in Mumbai sea without permission
West Indies cricket player IPL commentator Chris Gayle face trouble for filming in Mumbai sea without permission sakal
Updated on
Summary

मुंबईच्या समुद्रात परवानगी न घेता चित्रीकरण केल्याबद्दल वेस्ट इंडिजचा माजी फंलदाज आणि सध्याचा आयपीएलमधील समालोचक ख्रिस गेल अडचणीत सापडण्याची शक्यता

मुंबई : मुंबईच्या समुद्रात परवानगी न घेता चित्रीकरण केल्याबद्दल वेस्ट इंडिजचा माजी फंलदाज आणि सध्याचा आयपीएलमधील समालोचक ख्रिस गेल अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आयपीएलचे सामने सुरू असल्यामुळे जगभरातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटू मुंबईत आहेत. ख्रिस गेल समालोचनासाठी मुंबईत आला आहे.

त्याने पूर्वपरवानगी न घेता समुद्रात जाऊन बेकायदा चित्रीकरण केल्याची माहिती आहे. सध्या सागर कवच मोहीम सुरू असल्यामुळे समुद्रात काटेकोरपणे गस्त सुरू आहे. अशा वेळी बॉम्बे पोर्ट ट्रस्टची सुरक्षा भेदून ख्रिस गेल समुद्रात गेलाच कसा, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

मुंबईच्या समुद्रात जाण्यासाठी रीतसर परवानगी लागते. शिवाय समुद्रात चित्रीकरण करताना बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, नौसेना आणि सीमा शुल्क विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यातही परदेशी नागरिकाने परवानगी मागितल्यास संबंधितांच्या पासपोर्टची काटेकोरपणे तपासणी केली जाते. मात्र ख्रिस गेलने यापैकी कोणतीही परवानगी न घेता समुद्रात जाऊन चित्रीकरण केल्याचे सूत्रांनी सांगितले.

अशी बेकायदा कृती करून ख्रिस गेलने बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे; मात्र सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, ख्रिस गेल परतण्याची वाट मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारी पाहत असून तो आल्यावर त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.

माहिती उपलब्ध नाही!

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्याशी ख्रिस गेलच्या समुद्रातील चित्रीकरणाबाबत ‘सकाळ’ने संपर्क साधला असता ‘हा प्रश्न थेट माझ्या विभागाशी संबंधित नसल्यामुळे माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही. त्यांनी परवानगी घेतली की नाही, हे मला माहिती नाही. पोर्ट ट्रस्टच्या दोन ते तीन विभागांच्या अखत्यारीत हे येते. त्यामुळे उद्यापर्यंत माहिती देतो,’ असे त्यांनी सांगितले.

- नितीन बिनेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com