esakal | विंडीजचं काहीच कळत नाही.. कसोटी जिंकतात अन् ट्वेंटी-20 मध्ये मार खातात!
sakal

बोलून बातमी शोधा

Chris Jordan

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील झटपट क्रिकेट सामन्यांत संघाच्या कामगिरीतील टोकाचे चढउतार कायम राहिले आहेत. यावेळी दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विंडीजचा 45 धावांत खुर्दा उडाला. मालिकेतील आव्हान राखण्यासाठी विजय अनिवार्य असताना अशी घसरगुंडी उडाल्यामुळे त्यांना तब्बल 137 धावांनी पराभूत व्हावे लागले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन याने सहा धावांत चार विकेट टिपल्या. 

विंडीजचं काहीच कळत नाही.. कसोटी जिंकतात अन् ट्वेंटी-20 मध्ये मार खातात!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बॅसेटेरे (सेंट किट्‌स) : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील झटपट क्रिकेट सामन्यांत संघाच्या कामगिरीतील टोकाचे चढउतार कायम राहिले आहेत. यावेळी दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विंडीजचा 45 धावांत खुर्दा उडाला. मालिकेतील आव्हान राखण्यासाठी विजय अनिवार्य असताना अशी घसरगुंडी उडाल्यामुळे त्यांना तब्बल 137 धावांनी पराभूत व्हावे लागले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन याने सहा धावांत चार विकेट टिपल्या. 

इंग्लंडने 183 धावांचे आव्हान दिले होते, मात्र त्याआधी त्यांचीही 4 बाद 32 अशी घसरण झाली होती. तीन लढतींच्या मालिकेत इंग्लंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडचा डाव सॅम बिलींग्जने सावरला. त्याने 87 धावा केल्या. ज्यो रूटने 55 धावांचे योगदान दिले.

सविस्तर बातमी बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

विंडीजचं काहीच कळत नाही.. कसोटी जिंकतात अन् ट्वेंटी-20त 45 मध्ये आऊट होतात..!

loading image