वेस्ट इंडीजचा वर्ल्डकप हिरो सॅम्युल्सवर भ्रष्टाचाराचे आरोप

भ्रष्टाचार विरोधी पथकाने तब्बल चार प्रकरणांत त्याची चौकशी सुरू केली आहे.
Marlon Samuels
Marlon Samuels

दुबई : वेस्ट इंडीजच्या 2016 मधील ट्वेन्टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपदात निर्णायक योगदान देणाऱ्या खेळाडूंपैकी एक असलेला मार्लन सॅम्युल्स (Marlon Samuels) आयसीसीच्या चौकशी फेऱ्यात सापडला आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकाने तब्बल चार प्रकरणांत त्याची चौकशी सुरू केली आहे.

दुबईतील टी-10 या लीगसंदर्भात सॅम्युल्सवर हे आरोप आहेत. या लीगदरम्यान त्याने मिळालेल्या महागड्या भेटवस्तू, हिशोब नसलेला पैसा आणि आलिशान आदरातिथ्य याची माहिती त्याने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली नाही. त्याचप्रमाणे त्याच्याकडे सापडलेल्या काही महागड्या वस्तू खरेदीच्या रिसिटसचाही खुला तो करू शकला नाही. भ्रष्टाचार विरोधी चौकशी पथकाला चौकशीत सहकार्य न करणे आणि चौकशीत अडथळे आणणे अशी कलमे त्याच्यावर लावण्यात आली आहेत.

Marlon Samuels
पंजाबच्या खेळाडूची 'ती' पोस्ट म्हणजे मॅच फिक्सिंगचा सिग्नल?

21 सप्टेंबर रोजी सॅम्युल्सवर हे आरोप ठेवण्यात आले आहेत आणि त्यावर खुलासा करण्यासाठी त्याला 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आयसीसीने आरोप करताना नेमक्या कोणत्या वर्षीच्या टी-10 स्पर्धेबाबत संशय आहे हे स्पष्ट केलेले नाही.

Marlon Samuels
IPL 2021 : मँचेस्टर प्रमाणे मॅच रद्द होणार नाही; इंग्लिश मॅनचा BCCI ला टोला

40 वर्षीय सॅम्युल्सने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. 2016 मध्ये कोलकातात वेस्ट इंडीजने जिंकलेल्या टी-20 विश्वकरंक स्पर्धेतील अंतिम सामन्यात सॅम्युअल्स सर्वोत्तम ठरला होता. 2012 च्या स्पर्धेतही त्याने अशीच सर्वोत्तम कामगिरी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com