WI vs IND 2nd ODI : अक्षर पटेलची झुंजार खेळी; भारताने मालिका टाकली खिशात

West Indies vs India 2nd ODI Live Cricket Score Axar Patel
West Indies vs India 2nd ODI Live Cricket Score Axar Patelesakal

पोर्ट ऑफ स्पेन : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात (West Indies Vs India 2nd ODI) वेस्ट इंडीजचा 2 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताकडून अक्षर पटेलने (Axar Patel) झुंजार अर्धशतकी खेळी करत वेस्ट इंडीजने ठेवलेले विजयासाठीचे 312 धावांचे आव्हान 49.4 षटकात पार केले. त्याने षटकार ठोकत भारताचा मालिका विजय साकारला. अक्षर पटेलने 35 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली. याचबरोबर श्रेयस अय्यरने 63 तर संजू सॅमसनने 54 धावांची अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयाला हातभार लावला. वेस्ट इंडीजकडून शाय होपने 115 धावांची शतकी खेळी केली. त्याला कर्णधार निकोलस पूरनने 74 धावांची खेळी करून चांगली साथ दिली. भारताकडून शार्दुल ठाकूरने 3 तर वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफ आणि कायल मायेर्स यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

अक्षर पटेलचा विजयी षटकार

सामना 3 चेंडूत 6 धावा असा आला असताना अक्षर पटेलने मायेर्सला षटकार खेचत सामना स्टाईलमध्ये संपवला.

मोक्याच्या क्षणी दीपक हुड्डा बाद

भारताला विजयीपथावर घेऊन चाललेल्या दीपक हुड्डाला अकील हुसैनने 33 धावांवर बाद केले. दीपकने आक्रमक खेळी करत असलेल्या अक्षर पटेलसोबत 51 धावांची भागीदारी रचली होती.

205-5 : अय्यर सॅमसन जोडी माघारी परतली

श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी चौथ्या विकेटसाठी 99 धावांचा भागीदारी रचली. मात्र अल्झारी जोसेफने 71 चेंडूत 63 धावांची खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरला बाद केले. त्यानंतर 51 चेंडूत 54 धावा करून संजू सॅमसन धावबाद झाला.

79-3  : सूर्यकुमार कढून निराशा

भारताला एक महत्वपूर्ण भागीदारीची गरज असताना सूर्यकुमार यादव 9 धावा करून बाद झाला.

66-2 : शुभमन गिलचे अर्धशक हुकले

सलामीवीर शुभमन गिलचे अर्धशतक 7 धावांनी हुकले. त्याला मायेर्सने बाद केले.

48-1 : खेळ पुन्हा सुरू होताच भारताला पहिला धक्का

पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. रोमारियो शेफर्डने भारताचा कर्णधार शिखर धवनला 13 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

सामन्यात पावसाचा व्यत्यय

वेस्ट इंडीजने भारतासमोर विजयासाठी 312 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर भारतानेही आश्वासक सुरूवात केली. सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिलने 9.4 षटकात नाबाद 41 धावा केल्या. मात्र सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवावा लागला.

भारतासमोर 312 धावांचे आव्हान 

शाय होपच्या 115 आणि निकोलस पूरनच्या 74 धावांच्या जोरावर वेस्ट इंडीजने भारतासमोर 312 धावांचे आव्हान ठेवले.

शाय होपचे शतक, विंडीजची मोठ्या धावसंख्येकडे कूच

सलामीवीर शाय होपने षटकार मारत आपले 13 वे वनडे शतक पूर्ण केले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर विंडीजने 275 धावांचा टप्पा पार केला.

247-4 : कर्णधार निकोलस पूरनची दमदार खेळी संपुष्टात 

निकोलस पूरनने 74 धावांची खेळी करत शाय होपसोबत चौथ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी रचली. अखेर ही भागीदारी शार्दुल ठाकूरने तोडली.

WI 177/3 (33) : शाय होप - निकोलस पूरन यांनी डाव सावरला

भारतीय फिरकीपटूंनी विंडीजला पाठोपाठ धक्के दिल्यानंतर झुंजार खेळी करणारा शाय होप आणि कर्णधार निकोलस पूरन यांनी विंडीजचा डाव सावरत चौथ्या विकेटसाठी नाबाद 47 धावांची भागीदारी रचली.

130-3 : फिरकीपटूंनी जाळे फेकले

भारताच्या अक्षर पटेलने शामार ब्रुक्सला 36 धावांवर बाद केले. त्यानंतर युझवेंद्र चहलने ब्रँडन किंगला शुन्यावर बाद करत विंडीजचा तिसरा फलंदाज माघारी धाडला

दीपक हुड्डाने दिला विंडीजला पहिला धक्का

10 षटकात 65 धावांची सलामी देणाऱ्या विंडीजला पहिला धक्का दीपक हुड्डाने दिला. त्याने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या कायल मायेर्सनेला 39 धावांवर बाद केले.

WI 49/0 (7) : विंडीजची दमदार सुरूवात

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजने दमदार सुरूवात केली. सलामीवीर कायल मायेर्सने आक्रमक तर शाय होपने सावध फलंदाजी करत संघाचे अर्धशतक आठव्या षटकात धावफलकावर लावले.

भारताची प्लेइंग इलेव्हन

भारताने आपल्या संघात एकच बदल केला आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी वेगवान गोलंदाज आवेश खानला वनडे पदार्पणाची संधी दिली आहे.

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली

दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आवेश खान वनडे पदार्पण करणार

वेस्ट इंडीज विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज आवेश खान पदापर्ण करणार आहे. त्या प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com