Sports: जन्मतारीख बदलाच्या नोंदी कायमसाठी जतन करा!; कुस्ती संघटनेची प्राधिकरणाला विनंती; वयचोरी प्रकरणावर चाप लावण्यासाठी पाऊल

Wrestling Federation Seeks Permanent DOB Change Records: कुस्तीपटूंमधील वयचोरीच्या वाढत्या प्रकरणांमुळे भारतीय कुस्ती महासंघाने UIDAI कडे आधारमधील जन्मतारीख बदलांच्या नोंदी कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी केली आहे.
Sports

Sports

esakal

Updated on

नवी दिल्ली: भारतामध्ये विविध खेळांमधील खेळाडू वयचोरी प्रकरणात सापडतात. यामुळे वादविवाद निर्माण होत असतो. आता अशा बाबींना चाप बसण्यासाठी भारतीय कुस्ती संघटनेकडून कठोेर पाऊल उचलण्यात आले आहे. खेळाडू वय कमी दाखवून फसवणूक करीत असल्याच्या प्रकरणांवर कारवाई सुरू असताना, भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाला (यूआयडीएआय) आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलल्याच्या सर्व नोंदी कायमस्वरूपी जतन करण्याची विनंती केली आहे. तसेच, खूप वर्षांनंतर जन्मतारीख बदलण्यावर कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणीही केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com