Shane Warne: शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वी २० मिनिटांमध्ये थायलंडमध्ये काय घडले?

Shane Warne Greatness Unmatched
Shane Warne Greatness Unmatched esakal
Summary

शेन वॉर्नचे वयाच्या ५२ वर्षी निधन

थायलंडमध्ये हार्ट अॅटकमुळे संश्यास्पद मृत्यू

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू शेन वॉर्नचा थायलंडमध्ये ५२ वर्षाच्या वयामध्ये हार्ट अॅटकमुळे निधन झाले. या वृत्ताला त्यांच्या मॅनेजमेंटने दुजोरा दिला आहे. या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न थायलँडमध्ये कोह समुई येथील प्रायव्हेट व्हिलामध्ये ३ मित्रांसह थांबला होता.

घटनेच्या वेळी त्याच्या मित्रांनी साधारण २० मिनिट शेन वार्नचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला होता पण ते अपयशी ठरले. ही माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पण अद्याप, शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत कोणतेही संशयास्पद गोष्ट समोर आली नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.

Shane Warne Greatness Unmatched
शेन वॉर्नच्या निधनाचे वृत्त ऐकून पंतप्रधान भांबावले

मित्रांनी-डॉक्टरांनी केली जीव वाचविण्याचा पर्यंत

पोलिसांच्या माहितीनुसार, वॉर्न आणि त्याचे तीन मित्र एका प्रायव्हेट व्हिलामध्ये थांबले होते. दरम्यान रात्री जेवण करण्यासाठी शेन वॉर्न आला नाही तेव्हा त्याला पाहण्यासाठी मित्र त्याच्या रूममध्ये गेला. त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. त्याच वेळी मित्रांनी त्याला CPR देऊन त्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला आणि त्वरित अॅब्युलन्स बोलविण्यासाठी कॉलही केला.

वॉर्नला एमर्जन्सीमध्ये थाय इंटरनॅशल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे वॉर्नला साधारण ५ मिनिटांपर्यंत CPR देण्यात आला पण, डॉक्टर त्याचे प्राण वाचवू शकले नाही. त्यांनी मृत्यूचे कारण सांगितले नाही पण मृत्यू संशयास्पद असल्याचे त्यांना वाटले नाही.

Shane Warne Greatness Unmatched
Shane Warne: फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचं निधन

वॉर्नचा मृतदेह लवकरच ऑस्टेलियामध्ये पोहचणार

ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मारिस पायने यांनी वॉर्नसोबत उपस्थित मित्रांसह संवाद साधला. तसेच वॉर्नची मृतदेहाला ऑस्ट्रेलियामध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, आम्ही थाय प्रशासनासोबत संवाद साधत आहोत आणि त्यांना शक्य तितकी मदत करण्यास सांगितले आहे. लवकरच वॉर्नचा मृतदेह ऑस्ट्रेलियामध्ये पोहचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com