
मुंबई : मैदानावर केलेल्या कामगिरीची खरी माहिती रवी कधीच घरी सांगायचा नाही. त्याचप्रमाणे वानखेडे स्टेडियमवर त्याने एका षटकात मारलेल्या सहा षट्कारांच्या पराक्रमाची माहिती आम्हाला आमच्या परिसरातील भेळवाल्याने दिली आणि त्यानंतर रेडिओवर आम्ही ती ऐकली असा आपल्या मुलाच्या पराक्रमाचा किस्सा रवी शास्त्री यांची आई लक्ष्मी शास्त्री यांनी सांगितला.