Anmol Kharb Badminton : भारताची नवी 17 वर्षाची बॅडमिंटन स्टार अनमोल खाबर, पदार्पणाच्या सामन्यातच का आली चर्चेत?

Anmol Kharb A Rising Indian Badminton Player :बलाढ्य चीनला लोळवणारी 17 वर्षाची सायनाची फॅन अनमोल खारब आहे तरी कोण?
Anmol Kharb Badminton  Asia Team Championship
Anmol Kharb Badminton Asia Team Championshipesakal

Anmol Kharb Badminton Asia Team Championship : भारतीय महिला संघाने बॅडमिंटन एशियन टीम चॅम्पियनशिप स्पर्धेत बलाढ्य चीनचा 3 - 2 असा पराभव केला. पीव्ही सिंधूने पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ 2 - 1 असा पिछाडीवर होता. महिला दुहेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत बरोबरी साधली. त्यानंतर चीनसारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चारली ती 17 वर्षाच्या अनमोल खारबने!

Anmol Kharb Badminton  Asia Team Championship
IPL 2024 Schedule : आयपीएल 2024 भारतातच होणार... चेअरमन अरूण धुमल यांनी स्पष्टच सांगितलं

हरियाणाची असल्याने ती सायनाची फॅन असणं स्वाभाविकच आहे. मात्र सायनाची झलक देखील अनमोलमध्ये दिसते. तिने निर्णायक सामन्यात चीनच्या रँकिंगमध्ये शेकडो स्थानांनी पुढे असलेल्या चीनच्या वू लुओ यूचा 22-20, 14-21, 21-18 असा पराभव केला. तिने भारताच्या विजयासाठी कोर्टवर एक तास अन् 17 मिनिटं झुंज दिली. विशेष म्हणजे हा तिचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यामुळे भारतीय बॅडमिनंटनच्या क्षितीजावरचा उगवता तारा अनमोल खारब आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अनमोल खारब ही सायना नेहवालची फॅन आहे. पंचकुला इथल्या कृष्णा खैतान ज्युनियर स्पर्धेत तिने सायना नेहवालच्या फोटोसोबत सेल्फी काढला होता. नेहवालप्रमाणेच तिने देखील 17 वर्षाखालील राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली आहे.

सायनाबद्दल बोलताना अनमोल म्हणाली होती की, 'सायना दिदी ही जागित बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भारताचा डंका वाजवणाऱ्या पहिल्या खेळाडूंपैकी एक आहे. तिने ज्युनियर स्तरावर जी स्पर्धा जिंकली होती तीच स्पर्धा मी जिंकल्याने मला आनंद होत आहे. 2006 मध्ये माझा जन्म देखील झाला नव्हता. मात्र मी सायना दिदीचे 2006 च्या ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकलेले फोटो पाहिले आहेत त्यातूनच मला प्रेरणा मिळाली आहे. मी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार आहे आणि तिच्यासारखीच चांगली कामगिरी करणार आहे.'

Anmol Kharb Badminton  Asia Team Championship
Pat Cummins Wife : तुझ्या पत्नीवर प्रेम करतो... भारतीय चाहत्याच्या कमेंटवर कमिन्सने दिली भन्नाट प्रतिक्रिया

हरियाणाची युवा बॅडमिंटनपटू सुरूवातीला फरिदाबादच्या दयानंद पब्लिक स्कूलकडून खेळत होती. त्यानंतर तिने नोयडा येथील सनराईज शटलर अकॅडमीत सराव करण्यास सुरूवात केली. याबद्दल बोलताना अनमोल म्हणाली होती की, तिला बॅडमिंटन खेळण्याची सवय ही तिच्या भावामुळे लागली. भाऊ तिला बॅडमिंटन कोर्टवर घेऊन जात होता. तिथे ती मजा म्हणून बॅडमिंटन खेळत होती. मात्र भावाने आई-वडिलांना त्याला इंजिनियरिंग कारयचं असल्याचं सांगितलं अन् अनमोलनं बॅडमिंटनला सिरिअसली घेतलं.

ज्यावेळी अनमोलन बॅडमिंटनसाठी आपला तळ नोयडात हलवाल त्यावेळी तिच्यासोबत तिची आई राजबाला खाबर ही होती. अनमोलच्या सरावावेळी तिची आई दिवसभर अकॅडमीच्या बाहेर बसून असायची. आज अनमोलनं पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा गौरव वाढवणारी कामगिरी केली आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com