Ashes 2019 : कशाला हवेत जर्सीवर नाव अन्‌ नंबर?

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

आयसीसी कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या निमित्ताने आता कसोटी क्रिकेटमध्ये पांढऱ्या जर्सीवर खेळाडूंची नाव आणि नंबर टाकण्याची प्रथा सुरू झाली आहे. मात्र, याला काही खेळाडूंकडून विरोध होत आहे.

लाहोर - आयसीसी कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या निमित्ताने आता कसोटी क्रिकेटमध्ये पांढऱ्या जर्सीवर खेळाडूंची नाव आणि नंबर टाकण्याची प्रथा सुरू झाली आहे. मात्र, याला काही खेळाडूंकडून विरोध होत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट ली आणि ऍडम गिलख्रिस्ट यांनी सुरवातीला विरोध दर्शविल्यावर आता पाकिस्तानच्या शोएब अख्तरनेही "कशाला हवेत जर्सीवर नाव अन्‌ नंबर' असे वक्तव्य केले आहे. या निर्णयामुळे कसोटी क्रिकेटच्या पांढऱ्या जर्सीच्या पारंपरिक भावनेला तडा जात आहे. आयसीसीने या निर्णयाचा विचार करावा,असे ट्‌विट अख्तरने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why is the name and number on the jersey