Wi vs Ind 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्यात कशी असेल टीम इंडियाची Playing11 ? कर्णधार रोहित म्हणाला...

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून खेळला जाणार आहे. या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 Rohit Sharma West Indies vs India 2nd Test
Rohit Sharma West Indies vs India 2nd Test

Rohit Sharma West Indies vs India 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटीतील दुसरा आणि शेवटचा सामना 20 जुलैपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना 3 दिवसात एक डाव आणि 141 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या कसोटीसाठी पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे आमनेसामने असतील.

दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनवर कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचेही कौतुक केले आहे. खेळपट्टी आणि स्थिती पाहून कोणते 11 खेळणार यांचा निर्णय घेतला जाईल, असे रोहितचे म्हणणे आहे.

 Rohit Sharma West Indies vs India 2nd Test
IND vs BAN W 2nd ODI: बदला...! जेमिमा रॉड्रिग्जचा तडाखा अन् भारताने बांगलादेशचा उडवला 108 धावांनी धुव्वा

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या बातमीनुसार, रोहित दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल म्हणाला, 'आम्हाला डॉमिनिकामधील खेळपट्टी आणि स्थितीबद्दल चांगली माहिती होती. पण इथे (त्रिनिदाद) पावसाबद्दल काहीही स्पष्ट नाही, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठा बदल होईल असे मला वाटत नाही. मात्र येथील परिस्थिती आणि खेळपट्टी लक्षात घेता प्लेइंग 11 निश्चित होईल.

 Rohit Sharma West Indies vs India 2nd Test
Cricket News : ICC चे रेवेन्यू मॉडेल पाहून पीसीबी लागली रडायला! BCCI झाली मालामाल

रोहितने भारतीय संघातील खेळाडूंचेही कौतुक केले आहे. तो म्हणाले, आज ना उद्या बदल नक्कीच होतो. पण आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली याचा मला आनंद आहे. खेळाडूंची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच संघात त्याची भूमिका काय असेल हेही स्पष्ट केले आहे. त्यानंतर ते कसे तयारी करतात आणि कामगिरी कशी करतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

विशेष म्हणजे पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला होता. यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी 171 धावांची शानदार खेळी केली. तर रोहित शर्माच्या बॅटमध्येही शतक पाहायला मिळाले. रोहितने 103 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने 76 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 150 आणि दुसऱ्या डावात 130 धावांवर बाद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com