Wi vs IND T20 Nicholas Pooran on Hardik Pandya
Wi vs IND T20 Nicholas Pooran on Hardik Pandya

Wi vs IND T20: कर्णधार पांड्याला ओव्हर कॉन्फिडन्स नडला? पाचव्या टी-20 मध्ये पुरनने केली बोलती बंद, जाणून घ्या प्रकरण

Wi vs IND T20 Nicholas Pooran on Hardik Pandya : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिका संपल्यानंतर निकोलस पूरनने हार्दिक पांड्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पुरणने अकिल हुसैनसोबत एक व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये तो तोंड बंद ठेवण्याचे हावभाव करत आहे आणि त्याच्यासोबत अकील हुसेन आहे, जो फ्लाइंग किस देत आहे. हा व्हिडीओ शेअर करण्यासोबतच पूरणने लिहिले आहे की, कोणाला माहीत आहे.

Wi vs IND T20 Nicholas Pooran on Hardik Pandya
PM मोदींचे आवाहन BCCIला पडले महागात! DP बदलताच झाले मोठे नुकसान, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

निकोलस पूरणच्या पोस्टवरून तो काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे, परंतु त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक स्टोरी पोस्ट केल्या आहेत. हे पाहून पूरनने हार्दिक पांड्याला चोख प्रत्युत्तर दिले असून तोंड बंद ठेवण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावले होते, मात्र तिसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत सात विकेट्सने सामना जिंकला होता. यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, निकोलस पूरनला मला खेळायचे असेल तर त्याला खेळू द्या आणि हीच योजना होती, मी अशा स्पर्धेचा आनंद घेतो. मला माहित आहे की तो हे ऐकेल आणि चौथ्या टी-20 सामन्यात मला जोरदार फटका मारेल.

Wi vs IND T20 Nicholas Pooran on Hardik Pandya
Wi vs Ind T20: 'हारणे चांगले...' टीम इंडियाने मालिका गमावल्यानंतर हार्दिक पांड्यानं पुन्हा केलं अजब विधान

चौथ्या सामन्यात पूरनला कुलदीप यादवने लवकर बाद केले आणि भारतीय संघाने 179 धावांचे आव्हान अगदी सहजरीत्या पार केले. भारताकडून शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी अर्धशतके झळकावून संघाला विजय मिळवून दिला. पाचव्या सामन्यात निकोलस पूरनने हार्दिकचा ओव्हर कॉन्फिडन्स मोडला आणि166 धावांचा पाठलाग करताना त्याने हार्दिकच्या षटकात सलग दोन षटकार ठोकले.

Wi vs IND T20 Nicholas Pooran on Hardik Pandya
WI vs IND : ७ वर्षांनंतर वेस्ट इंडिजमध्ये गमावली मालिका! टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण?

पूरनने शानदार 47 धावा करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आणि तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. पूरनच्या शानदार फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने मालिका 3-2 अशी जिंकली. भारताने 25 महिन्यांत पहिली T20I मालिका गमावली आणि वेस्ट इंडिजने भारताकडून सलग 11 मालिका गमावल्यानंतर एक T20I मालिका जिंकली. T20 मालिकेतील हा विजय एकदिवसीय विश्वचषकात अपयशी ठरलेल्या वेस्ट इंडिजसाठी उत्साहवर्धक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com