Wimbledon: पहिले दोन सेट गमावल्यानंतर जोकोविचने जिंकला सामना; 11व्यांदा उपांत्य फेरीत

Wimbledon : इटलीच्या यानिक सिन्नरचे आव्हान संपुष्टात; जोकोविच उपांत्य फेरीत
Novak Djokovic
Novak Djokovicsakal

Wimbledon 2022: सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू, गतविजेता आणि अव्वल मानांकित नोवाक जोकोविच याने विम्बल्डन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली. सलग तीन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविचने इटलीच्या २० वर्षीय यानिक सिन्नर याची कडवी झुंज ५-७, २-६, ६-३, ६-२, ६-२ अशा पाच सेटमध्ये मोडून काढली. जोकोविचने ही लढत ३ तास व ३५ मिनिटांमध्ये जिंकली. (Novak Djokovic beats sinner tennis to reach 11th Wimbledon semifinal)

सिन्नर याने पहिले दोन सेट ७-५, ६-२ अशा फरकाने जिंकत दमदार सुरुवात केली. जोकोविचसाठी हा धक्का होता. त्यानंतर जोकोविचने तिसऱ्या सेटमध्ये ६-३ अशा फरकाने बाजी मारली आणि झोकात पुनरागमन केले. जोकोविचने चौथा व पाचवा सेट ६-२ अशा फरकानेच जिंकला आणि लढतीत यश संपादन केले.

नदाल - फ्रिटझ आमने-सामने

नदालने नेदरलँडच्या बोटीक झँडस्कल्प याच्यावर ६-४, ६-२, ७-६ अशा फरकाने विजय मिळवल्यानंतर आता त्याच्यासमोर उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या टेलर फ्रिटझ याचे आव्हान असणार आहे. टेलरने ऑस्ट्रेलियाच्या जेसन कबलर याला ६-३, ६-१, ६-४ अशा फरकाने हरवले व आगेकूच केली. नदाल - टेलर यांच्यामध्ये बुधवारी उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगणार आहे. नदाल दुखऱ्या पायासह फ्रेंच ओपनमध्ये सहभागी झाला. त्याने या स्पर्धेचे जेतेपदही पटकावले. आताही तो यामधून जात आहे. मात्र दुखापतीबाबत त्याने काहीही सांगितलेले नाही. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्यानंतर तो म्हणाला, मी थोडासा थकलेलो आहे. माझ्या फिटनेसबद्दल मी आता बोलू इच्छित नाही, असेही त्याने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com