wimbledon 2022: विजयासाठी जोकोविचचा संघर्ष; कोरियन खेळाडूला हरवत दुसऱ्या फेरीत

सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जिंकणारा तसेच अव्वल मानांकित असलेल्या नोवाक जोकोविचला विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅमची दुसरी फेरी
wimbledon 2022 tennis novak djokovic second round kwon soon match highlight
wimbledon 2022 tennis novak djokovic second round kwon soon match highlight

सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जिंकणारा तसेच अव्वल मानांकित असलेल्या नोवाक जोकोविचला विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅमची दुसरी फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. दक्षिण कोरियाच्या २४ वर्षीय सूनवू क्यॉन याने जोकोविचला कडवी झुंज दिली; मात्र गतविजेत्या जोकोविचने ही लढत ६-३, ३-६, ६-३, ६-४ अशा फरकाने जिंकली व पुरुषांच्या एकेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.(wimbledon 2022 tennis novak djokovic second round kwon soon match highlight)

या स्पर्धेचे सलग चौथे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने टेनिस कोर्टवर उतरणाऱ्या जोकोविच याने पहिला सेट ६-३ अशा फरकाने जिंकला आणि दमदार सुरुवात केली; मात्र दुसऱ्या सेटमधील चौथ्या गेममध्ये क्यॉनने जोकोविचची सर्व्हिस मोडली आणि त्यानंतर हा सेट ६-३ अशा फरकाने जिंकला, पण पुढील दोन सेटमध्ये कोरियाच्या टेनिसपटूला जोकोविचचे आव्हान परतवून लावता आले नाही. जोकोविचने तिसऱ्या सेटमध्ये ६-३ अशा फरकाने; तर चौथ्या सेटमध्ये ६-४ अशा फरकाने बाजी मारली. हरकाझचा पराभव

पहिल्याच दिवशी विम्बल्डनमध्ये सनसनाटी निकालाची नोंद झाली. स्पेनच्या ॲलेक्झँड्रो डेव्हिडोविचने सातवा मानांकित पोलंडच्या ह्युबर्ट हरकाझवर ७-६, ६-४, ५-७, २-६, ७-६ असा विजय मिळवला.

ट्युनिशियाच्या खेळाडूची कूच

ट्युनिशियाची २७ वर्षीय महिला टेनिस खेळाडू ओन्स जॅब्यूअर स्वीडनच्या मिरजाम बोर्कलंड हिला पराभूत करीत महिला एकेरीत पुढे पाऊल टाकले. ओन्सने मिरजामला ६-१, ६-३ असे हरवले.

थेट स्पर्धेत उतरला

विम्बल्डन स्पर्धेआधी जोकोविच हिरवळीच्या कोर्टवरील सराव स्पर्धा खेळला नाही. पहिल्या फेरीत याचा फटका त्याला बसला. कोरियन टेनिस खेळाडूने या लढतीत छान खेळ केला. त्याच्या फोरहँडच्या फटक्यांमध्ये दम वाटत होता. तसेच त्याने ड्रॉप शॉटसचाही छान वापर केला हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com