Wimbledon 2023 : 'जस्ट स्टॉप ऑईल'वाल्यांनी विंबल्डनमध्येही केला राडा; सामना थांबला

Wimbledon 2023
Wimbledon 2023esakal

Wimbledon Just Stop Oil : अॅशेस मालिकेत जस्ट स्टॉप आईलच्या आंदोलकांना थेट खेळपट्टीपर्यंत मजल मारत चांगलाच गोंधळ घातला होता. आता याच आंदोलकांनी विम्बल्डनच्या कोर्टवर देखील राडा केला आहे. विम्बल्डनच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी कोर्ट नंबर 18 वर सुरू असलेल्या सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता.

Wimbledon 2023
Virat Kohli Jonny Bairstow : बेअरस्टोची आता सटकली! रूट म्हणतो, ऑस्ट्रेलियाने विराटसारखी चूक केली आता...

दोन जस्ट स्टॉप आईल आंदोलकांनी सामना सुरू असताना कोर्टवर धाव घेत काही चकाकणाऱ्या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक आंदोलक टर्फवर मांडी घालून बसला. मात्र सुरक्षकांनी लगेचच या दोन आंदोलकांना मैदानाबाहेर काढले. त्यानंतर ग्राऊंड स्टाफने तो चकाकणारा पदार्थ साफ केला. यामुळे मैदानाला कोणतीही हानी झाली नाही.

मात्र ब्रिटनमधील विम्बल्डनसारख्या हाय प्रोफाईल आणि महत्वाच्या स्पर्धेची सुरक्षा भेदण्यात या आंदोलकाना यश आले. त्यामुळे मैदानावरील सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यावरणवादी समुहाने दुसऱ्या अॅशेस कसोटीत देखील असेच मैदानावर घुसून आंदोलन केले आहे.

Wimbledon 2023
Shubman Gill WI vs IND : गिल भारताचा पुढचा कर्णधार... गॅरी सोबर्स यांच्याशी बोलताना द्रविड काय म्हणाला?

या आंदोलकांनी या वर्षी झालेल्या प्रीमियरशिप रग्बीच्या फायनल सामन्यात आणि जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेत देखील ऑरेंज पावडर फेकत आंदोलन केले होते. याचबरोबर ग्रँड नॅशनल हॉर्स रेस स्पर्धेत देखील प्राणी प्रेमी आंदोलकांनी कुंपणाला स्वतःला बांधून घेत आंदोलन केले होते.

(Sports Latest news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com