
लंडन: अव्वल मानांकित यानिक सिनर व सहावा मानांकित नोवाक जोकोविच यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेमधील आपली विजयी वाटचाल कायम ठेवली; मात्र महिला एकेरी विभागात गतविजेती ठरलेली बार्बोरा क्रेझीकोव्हा हिला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले.