Tennis Semi finals: विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत जोकोविच आणि सिनर, तसेच अल्काराझ आणि फ्रिट्झ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही लढती अत्यंत चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.
लंडन : विम्बल्डन ग्रँडस्लॅम या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेमध्ये उद्या शुक्रवारी (ता. ११) होत असलेल्या पुरुष एकेरीतील उपांत्य फेरीच्या लढतीत मानांकित खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.