Wimbledon 2023 Prize Money: टेनिसपटू होणार श्रीमंत… विम्बल्डनची बक्षीस रक्कम यंदा ४ अब्ज, ६५ कोटी, ३७ लाख ३९ हजार

Wimbledon Prize Money 2023
Wimbledon Prize Money 2023

Wimbledon Prize Money 2023 : यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेतील बक्षीस रकमेत गतवेळच्या तुलनेत ११.२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एकूण बक्षीस रक्कम ४ कोटी ४७ लाख पौंड (४ अब्ज, ६५ कोटी, ३७ लाख ३९ हजार भारतीय रुपयांत) इतकी असणार आहे.

चार टेनिस ग्रँडस्लॅमध्ये सर्वात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या या विम्बल्डन स्पर्धेतील विजेते (पुरुष आणि महिला) २३ लाख ५० हजार पौंड, तर उपविजेते प्रत्येकी ११.५ लाख ५० हजार पौंडचे मानकरी ठरतील. २०२१ च्या तुलनेत ही वाढ फार मोठी आहे.

Wimbledon Prize Money 2023
Asia Cup Ind vs Pak : आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा होणार सामना? जाणुन घ्या कसे

कोरोनामुळे या वर्षी एकूण बक्षीस रकमेत १७ लाख पौंडची कपात करण्यात आली होती, मात्र गतवर्षी २० लाख पौंडची वाढ करण्यात आली होती. पात्रता स्पर्धेसाठी असलेल्या बक्षीस रकमेत १४.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

मुख्य स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभूत होणारा खेळाडूही रिक्त हस्ते परत जात नाही. त्याला मिळणाऱ्या बक्षीस रकमेत १० टक्के वाढ करण्यात आली असून त्याला कमीत कमी ५५ हजार पौंड मिळतील. स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत वाढ करताना आम्हाला आनंद होत आहे, असे ऑल इंग्लंड लॉन टेनिस संघटनेचे कार्याध्यक्ष इयन हेविट यांनी सांगितले.

Wimbledon Prize Money 2023
Wimbledon Prize Money 2023
Wimbledon Prize Money 2023
Asia Cup Schedule 2023: आशिया कपचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानला फक्त 4 सामने, श्रीलंकेत होणार स्पर्धा

कोरोनापूर्वीच्या काळात आम्ही अशाच प्रकारे भरघोस बक्षीस रक्कम देत होतो. कोरोनामुळे त्याला ब्रेक लागला होता. आता पुन्हा आम्ही बक्षिसांचा वर्षाव खेळाडूंवर करणार आहोत, असेही हेविट म्हणाले. यंदाची विम्बल्डन स्पर्धा ३ ते १६ जुलैदरम्यान होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com