न्यूयॉर्क : विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेती बार्बोरा क्रेझीकोव्हा हिला अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅममधील महिला एकेरीच्या लढतीत पराभवाचा धक्का बसला. रोमेनियाच्या एलिना रुस हिच्याकडून तिला ६-४, ७-५ असा पराभवाचा सामना करावा लागला..दरम्यान, सर्बीयाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याने अमेरिकन ग्रँडस्लॅममधील ९०वा विजय मिळवला आणि चारही ग्रँडस्लॅममधील संख्या ९० किंवा त्यावर नेत विक्रम नोंदवला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच टेनिसपटू ठरला, हे विशेष.झेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेझीकोव्हा हिने २०२१ मध्ये फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर या वर्षी तिला विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेतेपदावर मोहोर उमटवता आली, मात्र अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅममध्ये तिला आपली चमक दाखवता आली नाही..एलिना रुस हिच्याकडून झालेल्या पराभवानंतर बार्बोरा म्हणाली, विम्बल्डनमध्ये मनाजोगता खेळ करता आला. जेतेपद पटकावल्याचा मला अभिमानही आहे. विम्बल्डन ही स्पर्धा हिरवळीवर खेळवण्यात येते. अमेरिकन ओपन ही स्पर्धा हार्ड कोर्टवर पार पडते. दोन्हीमध्ये फरक आहे. फेब्रुवारीनंतर मी हार्ड कोर्टवर खेळलेली नाही. त्यामुळे अमेरिकन ओपन स्पर्धेमध्ये निराशेला सामोरे जावे लागले.ग्रँडस्लॅममधील नोवाकची कामगिरीऑस्ट्रेलियन - ९४ विजयफ्रेंच ओपन - ९६ विजयविम्बल्डन - ९७ विजयअमेरिकन - ९० विजय.प्रतिस्पर्ध्याची माघारनोवाक जोकोविच व लास्लो जेरे यांच्यामध्ये पुरुष एकेरीची लढत रंगली, मात्र दुखापतीमुळे लास्लो याने माघार घेतली. त्यामुळे जोकोविचला विजयी घोषित करण्यात आले, मात्र लास्लो याने माघार घेईपर्यंत झालेल्या खेळामध्ये जोकोविचचे वर्चस्व होते. दुसरा मानांकित जोकोविच याने पहिले दोन सेट ६-४, ६-४ असे जिंकले होते, तसेच तिसऱ्या सेटमध्ये त्याच्याकडे २-० अशी आघाडी होती.पहिलाच टेनिसपटूनोवाक जोकोविच याने अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये ९०वा विजय मिळवला. याचसह त्याने चारही ग्रँडस्लॅममध्ये ९० किंवा त्यापेक्षा जास्त विजय मिळवले आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव टेनिसपटू ठरला आहे, हे विशेष.गॉफ, मेडीसन, सबालेंका विजयीमहिला एकेरीच्या लढतींमध्ये मानांकित टेनिसपटूंनी विजयी वाटचाल केली. तिसरी मानांकित कोको गॉफ हिने टी. मारीया हिला ६-४, ६-० असे नमवले. दुसरी मानांकित एरीना सबालेंका हिच्याकडून लुशिया ब्रोंझेटी हिला ६-३, ६-१ अशी हार पत्करावी लागली. १४वी मानांकित मेडीसन के. हिने एम. जॉईंट हिच्यावर ६-४, ६-० अशी मात केली. पुरुषांच्या एकेरीत ॲलेक्झँडर झ्वेरेव ए. म्युलर याच्यावर सरळ तीन सेटमध्ये विजय संपादन केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.