esakal | 'विस्डन'च्या संघाचं नेतृत्व विराटकडे, पाच भारतीयांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

'विस्डन'च्या संघाचं नेतृत्व विराटकडे, पाच भारतीयांचा समावेश

'विस्डन'च्या संघाचं नेतृत्व विराटकडे, पाच भारतीयांचा समावेश

sakal_logo
By
नामदेव कुंभार

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात इंग्लंडला मायभूमीत पराभव करणं सध्याच्या घडीला खूपच कठीण आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाने मायभूमीत मागील 30 सामन्यात 21 विजय मिळवले आहेत. इंग्लंड सध्याच्या घडीला एकदिवसीय सामन्याचा विश्वविजेता संघ आहे. सध्याच्या इंग्लंड संघात एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्याच भूमीत त्यांचा पराभव करणं स्वप्नवत आहे. 'विस्डन'ने यासाठीच इंग्लंडव्यतिरिक्त इतर संघातील 11 खेळाडूंची निवड केली आहे. या संघाचं नेतृत्व भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे. (Wisden’s Rest of the World ODI XI to beat England in England)

'विस्डन'नं इंग्लडला त्यांच्याच घरात पराभूत करण्यासाठी रेस्ट ऑफ वर्ल्ड इलेव्हनची निवड केली आहे. इंग्लंडमधील परिस्थितीचा अंदाज घेत या संघाची निवड करण्यात आली आहे. सध्याच्या प्रदर्शनानुसार 11 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघात पाच भारतीय खेळाडूंचा समावेश असून नेतृत्व विराट कोहलीकडे आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे प्रत्येकी दोन खेळाडू आहेत. तर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान संघातील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड या संघातील एकाही खेळाडूला अंतिम 11 मध्ये निवडण्यात आलं नाही. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा संघ 2019 मध्ये झालेल्या विश्वचषकातील उपविजेता आहे.

हेही वाचा: WTC Final कोण जिंकणार? रिचर्ड हेडलींचं भाकीत

'विस्डन' संघ - रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक(यष्टीरक्षक), विराट कोहली(कर्णधार) बाबर आजम, के.एल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रविंद्र जडेजा, राशिद खान, मिशेल स्टार्क, शाहीन शाह अफरीदी आणि जसप्रीत बुमराह