esakal | महिला फुटबॉल संघाचे बांगलादेशवर सात गोल
sakal

बोलून बातमी शोधा

Football

महिला फुटबॉल संघाचे बांगलादेशवर सात गोल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - भारतीय महिला फुटबॉल संघाने ऑलिंपिक पात्रता मोहिमेस नवी चालना देताना बांगलादेशचा ७-१ असा पाडाव केला. भारतास सलामीला नेपालविरुद्ध गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली होती. साखळीतील क्रमवारी ठरवताना गोलफरक निर्णायक ठरू शकेल, हे लक्षात घेऊनच भारतीयांनी खेळ केला.

नेपाळविरुद्धच्या बरोबरीनंतर मार्गदर्शिका मायामाल रॉकी यांनी बदल केले आणि त्याचा नक्कीच फायदा झाला. बालादेवीने चार गोल करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. तिला कमला देवीने दोन आणि संजूने एक गोल करीत छान साथ दिली.

loading image
go to top