Women IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या क्षणी महिला आयपीएलमधून घेतली माघार

Women IPL 2023
Women IPL 2023 esakal

Women IPL 2023 : बीसीसीआयने जेव्हापासून महिला आयपीएलची सुरूवात केली जाणार असल्याची घोषणा केली होती तेव्हापासून याबाबत चाहत्यांध्ये उत्सुकता होती. नुकतीच महिला आयपीएलच्या प्रसारण हक्कासाठी लिलाव झाला होता. त्यानंतर कोणत्या फ्रेंचायजी महिला आयपीएलमधील संघ घेणार याबाबत चर्चा सुरू झाली होती.

मात्र मिळालेल्या माहितीनुसार पुरूष आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या संघापैकी एक चेन्नई सुपर किंग्जने महिला आयपीएलमधील फ्रेंचायजी खरेदी करण्याच्या रेसमधून माघार घेतली आहे. चेन्नई बरोबरच लखनौ सुपर जायंट आणि गुजरात टायटन्स यांनी देखील माघार घेतल्याची माहिती मिळत आहे. चेन्नईने महिला आयपीएलचे ITT डॉक्युमेंट घेतले होते.

Women IPL 2023
Athiya-Rahul wedding: अथिया-केएल राहुलचं खंडाळ्यात 'शुभमंगल'!

चेन्नई सुपर किंग्जने महिला आयपीएलमध्ये संघ खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे. सीएसकेने आयटीटी विकत घेतले होते. बीसीसीआयने खरेदी केलेले आयटीटी डॉक्युमेंट सादरण्यास सांगितले होते. मात्र सीएसकेने तसं केलेलं नाही. आयपीएलमध्ये नवखा असलेला लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांनी देखील महिला आयपीएलमधू माघार घेतली आहे अशी माहिती क्रिकबझने दिली आहे.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सने आपले आयटीटी डॉक्युमेंट सादर केले आहेत. मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या जेएसडब्लू आणि जीएमआर या दोन्ही ग्रुपनी वेगवेगळे डॉक्युमेंट विकत घेतले होते. दिल्ली कॅपिटल्स महिला आयपीएलमधील संघ विकत घेण्याच्या शर्यतीत असणार आहे.

Women IPL 2023
IND vs AUS Test Series : भारताला भारतात पराभूत करण्याचा 'हा' आहे फॉर्म्यूला; माजी कोचचा खास सल्ला

WIPL 2023 : कोण कोण आहे संघ खरेदी करण्यासाठी इच्छुक?

- अदानी ग्रुप (गल्फ जायंट्स) आणि काप्री ग्लोबल (शारजाह वॉरियर्स)

- मँचेस्टर युनायटेडचे मालक असलेली ग्लाझेर फॅमेली

- चेड्डीनाड सिमेंट आणि जेके सिमेंट

- चेन्नईची श्रीराम ग्रुप, निलगिरी ग्रुप, ए. डब्लू. काटकुरी ग्रुप

- दिल्ली कॅपिटल्सचे संयुक्त मालकी हक्क असलेले जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्लू ग्रुप

- एडब्लूएल अपोलो आणि हल्दीराम

- टोर्रेंट फर्मा, उदय कोटक

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनराईजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, राजस्थान रॉयल्स यांनी आपापले डॉक्युमेंट सादर केले आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com