महिला एकदिवसीय वर्ल्डकपबाबत जसं ठरलंय तसंच होणार! | Women's ODI World Cup Will be Organize as per schedule says ICC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's ODI World Cup Will be Organize as per schedule says ICC
महिला एकदिवसीय वर्ल्डकपबाबत जसं ठरलंय तसंच होणार!

महिला एकदिवसीय वर्ल्डकपबाबत जसं ठरलंय तसंच होणार!

कोरोना लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेला महिला एकदिवसीय वर्ल्डकप (Women's ODI World Cup) हा ४ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये सुरू होणार आहे. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन (Omicron variant) डोकं वर काढत असल्याने त्याचा फटका पुन्हा महिला क्रिकेट एकदिवसीय वर्ल्डकपला बसणार का अशी शंका व्यक्त केली जात होती. न्यूझीलंडने (New Zealand) कोरोना निर्बंध अधिक कडक करण्यासही सुरूवात केली आहे. मात्र आयसीसीने वर्ल्डकप हा ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे सांगितले. (Women's ODI World Cup Will be Organize as per schedule says ICC aas86)

हेही वाचा: आमच्याकडे अनेक कॅप्टन पण, रिझल्ट हा मुद्दा आहे : शमी

महिला वर्ल्डकपच्या सीईओ अँड्रा नेल्सन (Andrea Nelson) यांनी सांगितले की वर्ल्डकपच्या ३५ दिवसांच्या ठरलेल्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आम्ही जुन्या वेळापत्राकाप्रमाणेच स्पर्धा आयोजित करणार आहोत. नेल्सन माध्यम प्रतिनिधींच्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये बोलताना म्हणाल्या की, 'आम्ही अनेक प्लॅन्सवर काम केले पण, वर्ल्डकप हा ठरल्या वेळेनुसार न्यूझीलंडमधील सहा ठिकाणांवरच होईल.'

हेही वाचा: ICC ची मोठी कारवाई, झिम्बाब्वेच्या धाकड फलंदाजावर घातली बंदी

महिला एकदिवसीय वर्ल्डकपचे आठ संघातील ३१ सामने हे न्यूझीलंडच्या माउंट मौनगानुई, ड्युनडीन, वेलिंग्टन, ऑकलँड, हॅमिल्टन आणि ख्रिस्टचर्च येथे होणार आहेत. जरी स्थानिक आणि द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका या प्रेक्षकांविना खेळवल्या जात असल्या तरी महिला एकिदसीय वर्ल्डकप (Women's ODI World Cup) आयोजित करणाऱ्या समितीने चाहत्यांसाठी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.

Web Title: Womens Odi World Cup Will Be Organize As Per Schedule Says Icc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..