WPL 2023 GG vs MI : अदानी - अंबानी भिडणार! फ्रीमध्ये पाहता येणार वुमन्स प्रीमियर लीगचा ऐतिहासिक पहिला हंगाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WPL 2023 GG vs MI

WPL 2023 GG vs MI : अदानी - अंबानी भिडणार! फ्रीमध्ये पाहता येणार वुमन्स प्रीमियर लीगचा ऐतिहासिक पहिला हंगाम

WPL 2023 GG vs MI : बीसीसीआयची महत्त्वकांक्षी वुमन्स प्रीमियर लीग ही 4 मार्चपासून सुरू होत आहे. या लीगमध्ये पास संघांमध्ये 20 लीग स्टेजचे सामने होणार आहेत. या लीगचा पहिलाच सामना हा गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन तगड्या संघात होणार आहे. या सामन्याकडे अदानी विरूद्ध अंबानी असेही पाहिले जात आहे. कारण गुजरात जायंट्सची मालकी अदानी ग्रुपकडे असून मुंबई इंडियन्स हा अंबानींचा ब्रँड आहे.

इंग्लंडमधील द हंड्रेड वुमन स्पर्धा आणि ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग स्पर्धेतनंतर आता भारताच्या Womens Premier League चा नारळ फुटतो आहे. यामुळे महिला क्रिकेटविश्वासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. या लीगमुळे महिला क्रिकेट एका वेगळ्याच उंचीवर पोहचणार असल्याचे क्रिकेट पंडितांचे मत आहे.

या लीगमध्ये एकूण 22 सामने ( 20 लीग आणि 2 प्ले ऑफ) होणार असून 26 मार्च रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. यातील सर्व सामने हे मुंबई आणि नवी मुंबई येथे खेळवले जाणार आहे. या स्पर्धेबाबतची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे.

स्पर्धा कशी असेल?

या स्पर्धेत मुंबई इंडियन्स, गुजार जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि यूपी वॉरियर्स या 5 संघांचा समावेश आहे. या पाच संघात राऊंड रॉबिन पद्धतीने 20 साखळी सामने होणार आहेत. यात प्रत्येक संघ प्रत्येकी 8 सामने खेळणार आहे.

गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेला संघ थेट फायनलसाठी पात्र होईल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ अंतिम फेरीसाठी एकमेकांना एलिमिनेटरमध्ये भिडणार. यातील विजेता संघ पहिल्या स्थानावरील संघाशी अंतिम सामना खेळेल.

सामन्याची वेळ काय?

WPL मधील डबल हेडर सामन्यांची वेळ ही आयपीएलप्रमाणेच दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7.30 अशी असणार आहे.

पहिला सामना कधी होणार?

WPL च्या पहिल्याच हंगामाची सुरूवात ही 4 मार्चला मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर सायंकाळी 7.30 ला सुरू होईल.

सामना कोठे पहायचा?

WPL च्या थेट प्रक्षेपणाचे हक्क हे स्पोर्ट्स 18 या क्रीडा वाहिनीने घेतले आहेत. त्यामुळे सर्व सामना या चॅनलवर दिसतील. याचबरोबर जिओ सिनेमा अॅपवर WPL2023 चे सर्व सामने मोफत लाईव्ह स्ट्रीम होणार आहेत.

- याचबरोबर या WPL चा ऐतिहासिक पहिल्या हंगामाचे लाईव्ह कव्हरेज हे https://www.esakal.com/krida वर देखील पाहता येणार आहे.

गुजरात जायंट्सचा संघ :

अॅश्लेघ गार्डनेर, बेथ मूनी, सोफिया डंक्ले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डएन्ड्रा डॉटीन, स्नेह राणा, एस मेघना, जॉर्जिया वेअरहम, मानसी जोशी, डी हेमलता, तनुजा कुनवार, मोनिका पटेल, सुषमा वर्मा, हर्ले गाला, अश्विनी कुमारी, परूनिका सिसोदिया, शबमन शकील.

मुंबई इंडियन्सचा संघ :

हरमनप्रीत कौर, नॅट सिवर ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्रकार, यस्तिका भाटिया, हेथर ग्रॅहेम, इसाबेल वाँग, अमरजोत कौर, धारा गुज्जर, सैका इशाक, हेले मॅथ्यूज, चोले ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतिमानी कलिता, नीलम बिश्त.

(Sports Latest News)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...