
वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बुरा व भारताचा माजी कबड्डी कर्णधार दीपक हुड्डा यांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दीपक हुड्डा व स्वीटी बूरा हे पती पत्नी आहेत. स्वीटीने पती दिपकवर मारहाणीचा आरोप केला आहे. दीपकच्या कुटुंबाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा स्वीटीने केला. त्याचबरोबर दीपकने १ कोटी रूपये आणि फॉर्च्यूनरची मागणी केल्याचे स्वीटीने सांगितले. या प्रकरणी आता दोघांनीही पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.