World Championships: मीराबाईचा सहभाग; पण वजन उचलणार नाही! पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याकडे लक्ष

ऑलिंपिकची पात्रता फेरी असल्यामुळे जागतिक स्पर्धेत उतरणार
World Championships
World ChampionshipsSakal

World Championships : भारताची ऑलिंपिक पदकविजेती खेळाडू मीराबाई चानू चार सप्टेंबरपासून सौदी अरेबियातील रियाध येथे सुरू होणाऱ्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये नाममात्र सहभागी होणार आहे. मीराबाई या स्पर्धेमध्ये वजन उचलणार नाही.

जागतिक स्पर्धा ही पॅरिस ऑलिंपिकची पात्रता फेरी असल्यामुळे या स्पर्धेमध्ये खेळाडूंचा सहभाग अनिवार्य आहे. ऑलिंपिकमधील प्रवेशासाठी मीराबाई जागतिक स्पर्धेला हजेरी लावणार आहे.

जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा ४ ते १७ सप्टेंबर यादरम्यान रियाध येथे होणार आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर यादरम्यान चीनमधील हांगझाऊ येथे आयोजित करण्यात आली आहे.

World Championships
Mumbai Milk Rate : मुंबईत दूध महागणार, प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांची होणार वाढ !

दोन महत्त्वाच्या स्पर्धांमधील कालावधी कमी दिवसांचा आहे. मीराबाई हिने जागतिक स्पर्धेआधी आशियाई स्पर्धेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेत ती फक्त सहभागी होणार आहे, वजन उचलणार नाही. पॅरिस ऑलिंपिकची पात्रता फेरी म्हणून जागतिक स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य आहे. त्यामुळे तिला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे लागत आहे.

स्नॅच प्रकारात ९० किलो वजन उचलायचेय

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा याप्रसंगी म्हणाले, मीराबाईकडून स्नॅच प्रकारात ९० पेक्षा जास्त वजन उचलण्याची अपेक्षा केली जात आहे. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करीत आहोत. गेल्या काही काळामध्ये आम्हाला ९० चा आकडा ओलांडता आलेला नाही.

मीराबाई सध्या अमेरिकेत सराव करीत आहे. भारताच्या या खेळाडूच्या तंदुरुस्तीवरही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. कारण वाढत्या वयानुसार दुखापतीही वाढू शकतात, असे त्यांनी पुढे स्पष्ट सांगितले.

World Championships
Mumbai Fire : मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील गॅलेक्सी हॉटेलला आग; तिघांचा मृत्यू

उत्तेजक चाचणीलाही सामोरे जाणार

विजय शर्मा यांनी पुढे नमूद केले, की पॅरिस ऑलिंपिकची पात्रता फेरी म्हणून जागतिक स्पर्धेकडे बघितले जात आहे. त्यामुळे या स्पर्धेतील सहभागही अनिवार्य आहे; मात्र आम्ही मीराबाईला फक्त सहभागासाठी तिथे पाठवत आहोत.

ती कोणतेही वजन उचलणार नाही, पण उत्तेजक चाचणी केली गेल्यास मीराबाई तिला सामोरे जाईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, जागतिक स्तरावर खेळाडूंनी उत्तेजक घेतल्याची प्रकरणे वाढत असल्यामुळे आता प्रत्येक खेळातील खेळाडूंना घरी असताना किंवा स्पर्धेदरम्यान उत्तेजक चाचणीला सामोरे जावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com