World cricket commentator Sanjay Manjrekaresakal
क्रीडा
IPL Cricket : 'आयपीएल फक्त पैसा कमवण्यासाठी खेळतात असं म्हणणं म्हणजे..'; माजी क्रिकेटपटू मांजरेकर थेट भाष्य करत काय म्हणाले?
World cricket commentator Sanjay Manjrekar : आयपीएलमुळे क्रिकेट आणखी प्रसिद्ध झाले आहे. क्रिकेट अभ्यासक्रमात येत असेल, तर चांगलेच आहे. येथील स्थानिक खेळाडूदेखील उच्च पातळीपर्यंत जाऊन क्रिकेट खेळू शकतात.
मालवण : आयपीएल हे केवळ पैसा कमवण्यासाठी खेळतात असे म्हणणे उचित होणार नाही. आयपीएल एक प्रोफेशनल क्रिकेट (IPL Professional Cricket) आहे. आयपीएलमध्ये येणाऱ्या पैशातून अनेक चांगल्या गोष्टीही घडत आहेत, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू आणि जागतिक क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर Former (Cricketer Sanjay Manjrekar) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
