World Cup 1983 : विश्वविजेत्या संघाला बक्षीस देण्यासाठी BCCI कडे नव्हते पैसे, लतादीदींनी केली होती मदत..

संगीत, चित्रपट हे तर त्यांचं क्षेत्रच, याला तर भरभरून दिलंच, पण, त्यांच क्रिकेट, शिक्षण, आरोग्य, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहृदयता, सामाजिक उपक्रम या अशा अनंत ठिकाणी दीदींना आपल्या योगदान दिले.
world cup 1983
world cup 1983sakal

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी दीनानाथ रुग्णालयासाठी एक कोटी रुपये देण्याची इच्छा मृत्युपूर्वी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे या निधीचा धनादेश लतादीदींच्या ९४ व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने नुकताच रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानिमित्त लतादीदींच्या दातृत्वाच्या पैलूचे हे स्मरण.

कल्पवृक्ष असा मुळात कोणता वृक्ष अस्तित्वातच नाही. जे मागेल ते तो वृक्ष देतो, अशी काल्पनिक गोष्ट त्यामागे आहे. मात्र, प्रत्यक्षात काही व्यक्ती असतात, की ज्या आजूबाजूच्या लोकांना, समाजाला कायम काही न काही देत असतात. गानसम्राज्ञी लता मंगेशकर या त्यापैकी एक. त्यांना जेव्हापासून मी ओळखतो तेव्हापासून फक्त आणि फक्त देतानाच पाहिलं.

लतादीदी या व्यक्तिमत्त्वाने हात पुढे केला तो कायम देण्यासाठीच. अगदी सढळ हाताने द्यायचं आणि नंतर ते विसरूनही जायचं, इतका मोठेपणा महान व्यक्तीमध्ये होता. त्यांनी योगदान दिलं नाही, असं क्वचितच एखादं क्षेत्र असेल. संगीत, चित्रपट हे तर त्यांचं क्षेत्रच, याला तर भरभरून दिलंच, पण, त्यांच क्रिकेट, शिक्षण, आरोग्य, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहृदयता, सामाजिक उपक्रम या अशा अनंत ठिकाणी दीदींना आपल्या योगदान दिले. त्यामुळे दातृत्व हाच दीदींचा स्थायीभाव होता, हेच अधोरेखित होते.अक्षरशः एका गुलाबाच्या फुलाच्या मोबदल्यात दिदींना मराठी गाणी गायली आहेत.

याची सुरवात जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’या पहिल्या चित्रपटापासून झाली. या चित्रपटातील एक गाणे गावे, अशी विनंती जब्बार यांनी दीदींना केली. मात्र, ‘फी’ परवडणार नाही, असे ते म्हणाले. ‘‘गुलाबाचं एक फूल परवडणार नाही, असा माणूस असू शकत नाही,’’ अशा शब्दात दीदींनी जब्बार यांना उत्तर दिले. ‘सख्या रे, घायाळ मी हरिणी’ हे गीत गुलाबाच्या एका फुलाच्या मोबदल्यात गायले आहेत. ‘‘हिंदी गाण्यातून मला खूप पैसे मिळाले. मराठी आपली मातृभाषा आहे. त्यामुळे मराठी गाण्यासाठी कधी पैसे मागितले नाही,’’ असे त्यांना बोलताना सांगितले होते.

world cup 1983
Cricket World Cup 2023 : पाकिस्तानसाठी सलामी सोपी मात्र गाफील राहणे पडू शकते महागात !

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या उभारणीसाठी पुण्यासह निगडी, हैदराबादेत कार्यक्रम घेतले. त्यासाठी चित्रसृष्टीतील असंख्य दिग्गज कलाकार फक्त दीदींच्या प्रेमासाठी स्वखर्चाने येत होते. त्यामागचे प्रेरणा म्हणजे फक्त दीदी. यावरून दीदींची प्रतिमा अशी होती की, दुसरा माणूसही देण्यासाठी प्रवृत्त होत असे. त्याचे वर्णन विंदाच्या कवितेच्या ओळीने करता येईल. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.’

क्रिकेट मंडळासाठी दिला आवाज

भारताने १९८३ चा विश्व करंडक जिंकला. प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपयांचा बोनस जाहीर केला. पण, हे पैसे देण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाकडे पुरेसा निधी त्यावेळी नव्हता. अखेर, दीदींचा एक कार्यक्रम नव्या दिल्लीमध्ये झाला. त्यातून ४६ लाख रुपयांचा निधी संकलित झाला. अशा अत्यंत अडचणीत असलेल्या क्रिकेट मंडळाला दीदींना आपला आवाज सहजतेने दिला होता. जिथे-जिथे दीदी गेल्या तेथे-तेथे पैसा गौण होतो, हे अशा कितीतरी उदाहरणांवरून मी अनुभवले आहे.

world cup 1983
Mumbai News : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट ; कोणते मंत्री येणार अडचणीत ?

दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची वेळ आली त्यावेळी आधी पैसे रुग्णालयात पाठविले आहेत. त्यात दीदी आणि आशा भोसले यांनी कधीही झुकते माप घेतले नाही. घरात आलेल्या ओळखीची महिला घरातून रिकाम्या हाताने गेली नाही. काही न काही त्या देतच. घरात येणाऱ्याला काय दिले म्हणजे याची तयारी त्या आधीपासून करून ठेवत. त्यामुळे आयत्यावेळी होणारी कोणतीच धावपळ त्यांची कधीच झाली नाही. त्यातून देणे हे त्यांची नैसर्गिक वृत्ती होती.

एखाद्याचे गाणे आवडले किंवा वाजविलेले संगीत थेट काळजाला भिडले, अशा कलाकाराला आपल्या हातातील कोणतीही मौल्यवान वस्तू दीदींनी काढून दिल्याची असंख्य उदाहरणे आहेत. दीदींनी त्यांच्या बोटातील अंगठी उस्ताद पंडित झाकिर हुसेन यांच्या हातात दिल्याची घटना प्रसिद्ध आहे. अशी घटना फक्त एकदा घडली नाही तर ती वारंवार झाली. त्यामुळे त्यांची फक्त देण्याचीच वृत्ती होती.

...आणि आश्रमशाळा उभी राहिली

कर्वे संस्थेच्या आश्रमशाळा उभारण्यासाठी दीदींनी त्यांच्या खासदार निधीतील ५० लाख रुपये. त्याला दीदींचे नाव नाही. तेथे त्यांच्या पुतळा नाही. अशी कामशेत येथे उभा राहिलेल्या आदिशक्ती शाळेला सर्वोत्तम आश्रम शाळेचा पुरस्कार मिळत आहे. हा निधी दिल्यानंतर त्याचा कोणतीही पाठपुरावा नाही. देशाच्या लष्कराला नियमितपणे भरभक्कम देणग्या दिल्या आहेत. त्यामुळे मी दीदींना फक्त देताना पाहिले आहे.

(शब्दांकन : योगिराज प्रभुणे

world cup 1983
Mumbai Fire News: मुंबईतील गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू ४६ जण जखमी

अंतिम इच्छेची पूर्तता...

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना अखेरच्या काळात योग्यवेळी उपचार न मिळाल्याने त्यांचे पुण्यात १९४२ मध्ये निधन झाले. तेव्हापासून श्रीमती माई मंगेशकर यांच्या मनात होते की, पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने एक सुसज्ज रुग्णालय बांधावे. त्यात उपचाराअभावी कोणत्याही रुग्णाचे हाल होऊ नये, अशी इच्छा माईंनी लतादीदींकडे व्यक्त केली. त्यातून २००१ मध्ये पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उभे राहिले.

या रुग्णालयासाठी लता मंगेशकर यांनी त्यांच्या हयातीत तन, मन, धन अर्पण केले. या सर्वात कळस म्हणजे दीदींनी मृत्यूपूर्वी दीनानाथ रुग्णालयासाठी एक कोटी रुपये देण्याची अंतिम इच्छा सांगितली होती. त्याप्रमाणे या निधीचा धनादेश लतादीदींच्या ९४ व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांना भारती मंगेशकर यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला आणि दीदींच्या अंतिम इच्छेची पूर्तता झाली, अशी भावना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली.

(लेखक दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com