World Cup 2019 : रो'हिट' विराजमान मास्टर-ब्लास्टरच्या पंक्तीत!

वृत्तसंस्था
Sunday, 7 July 2019

एका वर्ल्ड कपमध्ये सहाशे धावांचा टप्पा त्याने पार केला. याबरोबरच त्याने साक्षात मास्टर-ब्लास्टर अर्थात सचिन तेंडुलकरच्या कामगिरीशी बरोबरी केली.

वर्ल्ड कप 2019 : लिड्‌स : स्वप्नातही पाहता येणार नाही असा फॉर्म गवसलेला भारतीय फलंदाज रोहित शर्मा आज (शनिवार) आणखी एका माईलस्टोनसह दिग्गजांच्या पंक्तीत विराजमान झाला. एका वर्ल्ड कपमध्ये सहाशे धावांचा टप्पा त्याने पार केला. याबरोबरच त्याने साक्षात मास्टर-ब्लास्टर अर्थात सचिन तेंडुलकरच्या कामगिरीशी बरोबरी केली. श्रीलंकेविरुद्ध शनिवारी रोहितने ही कामगिरी केली. त्याने स्पर्धेतील पाचवे शतक फटकावले. या खेळीत 56 धावा पूर्ण झाल्या तेव्हा त्याने हा टप्पा गाठला. रोहितला सचिनला विक्रम मागे टाकण्याची चांगली संधी आहे. 

रो'हिट'चा पराक्रम 
- एका वर्ल्ड कपमध्ये 600 धावा करणारा दुसरा भारतीय 
- या स्पर्धेतील पाचवे शतक 
- या लढतीपूर्वी 544 धावा 
- 2003च्या स्पर्धेत सचिनने 673 धावा काढल्या होत्या 
- सर्वाधिक धावांचा उच्चांक सचिनचा 
- या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू हेडन दुसरा 
- हेडनच्या 2007च्या स्पर्धेत 11 सामन्यांत 659 धावा 
- एका स्पर्धेत पाच शतके काढलेला पहिला फलंदाज 
- श्रीलंकेच्या कुमार संगकारा याचा 2015च्या स्पर्धेतील चार शतकांचा उच्चांक मागे टाकला 
- रोहितची वन-डेमध्ये तीन द्विशतके 
- असा पराक्रम केलेला एकमेव फलंदाज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 Rohit Sharma equals Sachin Tendulkars records