World Cup 2023 : विजयाच्या हॅटट्रिकसाठी न्यूझीलंड सज्ज ; जाणून घ्या काय असेल टीम प्लॅन !

World Cup 2023
World Cup 2023sakal

World Cup 2023 : आतापर्यंत एकही विश्‍वकरंडक न पटकावलेला न्यूझीलंडचा क्रिकेट संघ यंदा दमदार खेळ करीत आहे. भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात त्यांनी गतविजेत्या इंग्लंड व नेदरलँड यांना पराभूत करताना उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे.

प्रमुख खेळाडू केन विल्यमसन याच्या पुनरागमनामुळे न्यूझीलंड संघातील खेळाडूंचा आत्मविश्‍वास आणखी उंचावला असेल. आता उद्या विश्‍वकरंडकातील विजयाच्या हॅट्‌ट्रिकसाठी हा संघ मैदानात उतरेल. बांगलादेशच्या संघाला मात्र सलग दुसरा पराभव टाळण्यासाठी मैदानात उतरावे लागणार आहे.

बांगलादेशविरुद्ध लढतीच्या आदल्या दिवशी केन विल्यमसन म्हणाला, ‘‘दुखापत झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले. आता विश्‍वकरंडकासाठी न्यूझीलंड संघात पुनरागमन करता आले आहे. याचा आनंद आहे. टीम साऊथी दुखापतीमधून सावरत आहे, पण बांगलादेशविरुद्धच्या लढतीत तो खेळू शकणार नाही.’’

तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार?

केन विल्यमसनचे न्यूझीलंड संघात पुनरागमन होणार आहे. याचा आनंद आहे, पण न्यूझीलंडच्या व्यवस्थापनासमोर यक्षप्रश्‍न असणार आहे. राचिन रवींद्र याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहिल्या दोन लढतींत शतक व अर्धशतक झळकावले आहे.

केन विल्यमसन हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. आता केन विल्यमसनच्या पुनरागमनानंतर तिसऱ्या क्रमांकावर कोणता खेळाडू फलंदाजी करील, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील विश्‍वकरंडकातील लढत चेन्नईत पार पडली होती. या लढतीत रवीचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा व कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांनी मिळून सहा फलंदाज बाद केले होते. त्यामुळे न्यूझीलंड-बांगलादेश यांच्यामधील लढतीतही फिरकी गोलंदाजांचा बोलबाला राहण्याची शक्यता आहे.

बांगलादेशच्या संघात शाकीब उल हसन, मेहदी हसन व मेहदी हसन मिराज हे फिरकी गोलंदाजीचे त्रिकूट आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांना याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. न्यूझीलंडच्या संघाची फिरकी गोलंदाजीची मदार मिचेल सँटनर याच्या खांद्यावर असेल. ग्लेन फिलीप्स व राचिन रवींद्र हे पार्टटाईम फिरकी गोलंदाज दिमतीला असतील.

World Cup 2023
World Cup 2023 : कर्णधार रोहितने केला 'तो' रेकॉर्ड फक्त १ तास टिकला

सलग तिसऱ्या विश्‍वकरंडकात साधणार ध्येय

न्यूझीलंडच्या संघाने २०१५ व २०१९ या दोन वर्षांमध्ये झालेल्या विश्‍वकरंडकातील पहिल्या तीन लढतींमध्ये विजय मिळवला होता. आता २०२३ मधील पहिल्या दोन लढतींत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आहे. मागील दोन विश्‍वकरंडकाची बरोबरी साधण्यासाठी न्यूझीलंडला एका विजयाची गरज आहे. बांगलादेशवर विजय मिळवल्यास त्यांना सलग तीन विश्‍वकरंडकात सलग तीन लढतींमध्ये विजय मिळवता येणार आहे.

किवींचे पारडे जड

न्यूझीलंड-बांगलादेश यांच्यामध्ये आतापर्यंत ४१ एकदिवसीय लढती खेळवण्यात आल्या आहेत. किवी अर्थातच न्यूझीलंडने यापैकी ३० लढतींमध्ये विजय संपादन केला आहे. बांगलादेशने १० लढतींमध्ये विजय मिळवला आहे. दोन देशांमधील एका लढतीचा निकाल लागलेला नाही. दोन देशांमध्ये झालेल्या लढतींच्या निकालावरून न्यूझीलंडचे पारडे जड असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

World Cup 2023
World Cup 2023 : सामन्यांपेक्षा शतकंच जास्त! भारतातील वर्ल्डकपमध्ये चाललयं तरी काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com