World Cup 2023: न्यूझिलंडची विजयी घोडदौड सुरुच, नेदरलंडचा ९९ धावांनी दणदणीत पराभव

हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर आयोजित खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझिलंडने नेदरलंडचा ९९ धावांनी पराभव केला.
World Cup 2023: न्यूझिलंडची विजयी घोडदौड सुरुच, नेदरलंडचा ९९ धावांनी दणदणीत पराभव
Updated on

World Cup 2023: सध्या आयसीसी विश्वचषक २०२३च्या स्पर्धेचं आयोजन भारतात कऱण्यात आलं आहे. या स्पर्धेत न्यूझिलंड आणि नेदरलंड हे संघ आमनेसामने होते. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर आयोजित खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझिलंडने नेदरलंडचा ९९ धावांनी पराभव केला.

नेदरलंडने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.न्यूझिलंडने संघाला फलंदाजीचं आमंत्रण देण्यात आलं. न्यूझिलंडच्या फलंदाजांनी चांगलं प्रदर्शन करत धावफलकावर निर्धारित ५० षटकांमध्ये ३२२ धावा लावल्या. न्यूझिलंड संघासाठी विल यंग याने सर्वाधिक ७० धावा केल्या. तसेच, रचिन रविंद्र आणि टॉम लिथम यांनी अर्थशतक झळकावलं.

या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या नेदरलँडची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर विक्रमजीत सिंह आणि मॅक्स ऑ'डाऊड हे १२ आणि १६ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाले. त्यानंतर कॉलिन एकरमॅनने नेदरलंडचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याने ७३ चेंडूत ६९ धावा केल्या. त्यानंतर ठराविक काळाने त्यांचे गडी बाद होत गेले आणि संघ २३३च्या धावसंख्येवर सर्वबाद झाला आणि नेदरलंडचा ९९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com