World Cup 2023 Tickets : ऑनलाईनच्या जमान्यात बीसीसीआय अजून ऑफलाईनच? अधिकृत तिकीट पार्टनरचा पत्ताच नाही

World Cup Online Tickets Booking
World Cup Online Tickets Bookingesakal

World Cup 2023 Tickets : भारतातील वनडे वर्ल्डकप हा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र वेळापत्रकापासून ते तिकीटविक्रीपर्यंत सर्वच बाबतीत बीसीसीआयने गोंधळाचे वातावरण निर्माण करून ठेवले आहे. वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर आला तरी अजून ना बीसीसीआयने ना आयसीसीने सामन्याची ऑनलाईन तिकीटं कुठं आरक्षित करायची याची माहिती उघड केलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून मिळत असलेल्या वृत्तानुसार भारतीय क्रिकेट बोर्ड ऑनलाईन तिकीट विक्रीची जबाबदारी ही बूक माय शो कडे देण्याची शक्यता आहे. (World Cup Online Tickets Booking)

World Cup Online Tickets Booking
Rohit Sharma : युवराजनंतर कोण मिळाला नाही.... कोणाचंही स्थान पक्क नाही! रोहितनं विराटलाही दिलं टेन्शन

भारतातील क्रिकेट रसिक हे वर्ल्डकपची चातकासारखी वाट पाहत आहेत. वर्ल्डकप सुरू होण्याला दोन महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. बीसीसीआय तिकीट खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी चाहत्यांसाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म देण्याची शक्यता आहे. याबाबत करार देखील केला जाईल.

आयसीसी आणि बीसीसीआयने संयुक्तरित्या घोषणा केल्याप्रमाणे वनडे वर्ल्डकप 2023 ची तिकीटे ही 25 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे. ही घोषणा वर्ल्डकपचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानंतर केली गेली. भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री ही 3 सप्टेंबरला होणार आहे. तर सेमी फायनल आणि फायनल ची तिकीट विक्री ही 15 सप्टेंबरला होणार आहे.

मात्र क्रिकेट चाहत्यांना तिकीट खरेदी करण्यापूर्वी https://www.cricketworldcup.com/register या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या नोंदणीमुळे चाहत्यांना तिकीट विक्रीबाबत सर्व उपडेट आधी मिळणार आहेत.

World Cup Online Tickets Booking
World Badminton Competition जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सिंधू, श्रीकांत, लक्ष्य, प्रणॉयवर मदार

भारताच्या सामन्यांची तिकीटे कधी करायची बूक?

25 ऑगस्ट - भारताव्यतिरिक्त इतर सराव आणि मुख्य स्पर्धेतील सामन्यांची तिकीटे

30 ऑगस्ट - भारताचे गुवाहाटी, त्रिवेंद्रम येथील सराव सामने

31 ऑगस्ट - भारताचे चेन्नई (vs ऑस्ट्रेलिया), दिल्ली (vs अफगाणिस्तान) आणि पुण्यातील (vs बांगलादेश) सामने

1 सप्टेंबर - भारताचे धरमशाळा (vs न्यूझीलंड), लखनौ (vs इंग्लंड), मुंबई (vs श्रीलंका) येथील सामने

2 सप्टेंबर - भारताचे बंगळुरू (vs नेदलँड), कोलकाता (vs दक्षिण आफ्रिका) येथील सामने

3 सप्टेंबर - अहमदाबाद येथील भारत विरूद्ध पाकिस्तान सामना

15 सप्टेंबर - मुंबई आणि कोलकाता येथील सेमी फायनल आणि अहमदाबाद येथील फायनल

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com