

Olympic Day 2026: Uniting the World Through Sport
जागतिक ऑलिम्पिक दिन दरवर्षी २३ जूनला जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस क्रीडा संस्कृती, शारीरिक तंदुरुस्ती आणि ऑलिम्पिक मूल्यांचा (उत्कृष्टता, मैत्री आणि आदर) प्रसार करण्यासाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवसाची यंदाची थीम आणि महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया.
जागतिक ऑलिम्पिक दिन २०२६ ची काय आहे थीम ?
यंदाच्या ऑलिम्पिक दिनाची मुख्य थीम "खेळ: पूल बांधणे, अडथळे तोडणे" (Sport: Building Bridges, Breaking Barriers) अशी आहे. ही संकल्पना खेळातून जागतिक शांतता, एकता आणि लिंग, धर्म किंवा राष्ट्रीयत्वाच्या भिंती तोडून समावेशाला प्रोत्साहन देण्यावर भर देते.