World Table Tennis Championships 2022 : भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manika Batra

World Table Tennis Championships 2022 : भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात

चेंगडू (चीन) : भारतीय महिला खेळाडूंचे जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान बुधवारी संपुष्टात आले. चीन तैपई संघाकडून भारताला ३-० असे पराभूत व्हावे लागले. त्यामुळे भारतीय महिला संघ उपउपांत्यपूर्व फेरीतच गारद झाला.

मनिका बत्रा हिला या स्पर्धेमध्ये सूर गवसला नाही. चेन झू यू हिच्याकडून मनिका हिला ११-७, ११-९, ११-३ (३-०) असे पराभूत व्हावे लागले. त्यानंतर बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस खेळातील मिश्र गटात सुवर्णपदक पटकावणारी श्रीजा अकुला हिलाही अव्वल दर्जाचा खेळ करता आला नाही. चेंग चिंग हिने अकुला हिच्यावर ११-८, ५-११, ११-६, ११-९ (३-१) असा विजय साकारला. दिया चितळे हिने अखेरच्या लढतीत कडवी झुंज दिली, पण तिला काही विजय मिळवता आला नाही. लिऊ यीन हिने दियाचे कडवे आव्हान ११-६, ९-११, ९-११, ११-८, ११-७ (३-२) असे परतवून लावले.

आता मदार पुरुषांवर

यामध्ये भारताची मदार पुरुषांवर असणार आहे. भारताचा पुरुषांचा संघ उपउपांत्यपूर्व लढत उद्या खेळणार आहे. या वेळी भारतीय पुरुष संघासमोर चीनचे आव्हान असणार आहे.