esakal | WTC Final : प्लेइंग इलेव्हनवर अजिंक्यने असा दिला रिप्लाय
sakal

बोलून बातमी शोधा

ajinkya rahane

WTC Final : प्लेइंग इलेव्हनवर अजिंक्यने असा दिला रिप्लाय

sakal_logo
By
सुशांत जाधव

World Test Championship Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या लढतीला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरलाय. कसोटी चॅम्पियन ठरवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मेगा फायनलपूर्वी भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांने ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्समध्ये संवाद साधला. आगामी लढतीसाठी टीम इंडिया सज्ज आहे. प्लेइंग इलेव्हन कशी असेल? असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, सध्याच्या घडीला प्लेइंग इलेव्हनचा कोणताही निर्णय झालेला नाही. इंग्लंडमधील हवामान आणि खेळपट्टीच्या अंदाजावरुन यासंदर्भातील योग्य तो निर्णय घेतला जाईल. (World Test Championship Final Ajinkya Rahane On Playing 11)

इंग्लंडमधील वातावरण घटकेला बदलते. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही आणखी दोन प्रॅक्टिस सेशन घेणार आहोत. खेळपट्टी पाहिल्यानंतरच कोणत्या रणनितीने उतरायचे हे पक्के होईल, असे अजिंक्य रहाणेनं सांगितले. टेस्टमध्ये बेस्ट ठरायचे असल्यास फलंदाजांना उत्तम खेळ करावा लागेल, असे मतही त्याने यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा: WTC : 15 पैकी 6 जण टीम इंडियाच्या प्लेइंग XI मध्ये फिक्स!

मैदानात ओलावा असेल तर गोलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सामन्याचा निकाल हा फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून असेल, असे तो म्हणाला. आम्ही इतर सामन्याप्रमाणेच या सामन्याकडेही पाहत आहोत. त्यामुळे फायनलवेळी कोणताही दबाव नसेल, असेही त्याने स्पष्ट केले. न्यूझीलंडचा संघ संतुलित आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही, असा उल्लेखही त्याने आवर्जून केला.

हेही वाचा: WTC Final : रोहित स्विंगसमोर अडखळतो, स्कॉट स्टायरिसचा दावा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रहाणेची कामगिरी

भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. रहाणेने 17 सामन्यात 43.80 च्या सरासरीने 1095 धावा केल्या आहेत. यात 3 शतकांसह 6 अर्धशतकांचाही समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा निश्चितच असेल.

loading image