esakal | WTC INDvsNZ : वातावरणाची 'कसोटी'; चौथा दिवसही पावसाचा
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ

WTC INDvsNZ : वातावरणाची 'कसोटी'; चौथा दिवसही पावसाचा

sakal_logo
By
सुशांत जाधव

ICC World Test Championship Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या दिवसाचा संपूर्ण खेळ देखील पावासामुळे वाया गेला. त्यामुळे आता पाचवा आणि राखीव स्वरुपातील एक दिवस मिळून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे. या दोन दिवसात सामन्याचा निकाल लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाचा खेळ असाच सुरु राहिला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या वहिल्या फायनलमध्ये आपल्याला भारत-न्यूझीलंड संयुक्तपणे जेतेपद मिळवताना पाहायला मिळेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यातील पहिला दिवस संपूर्णपणे पावसाने गाजवला. दुसऱ्या दिवशी अंधूक प्रकाशामुळे वेळेआधीच खेळ थांबला. दुसऱ्या दिवशी केवळ 64.4 षटकांचा खेळ झाला. रविवारी तिसऱ्या दिवशी वातावरणाने बऱ्यापैकी साथ दिली. पण 76.3 षटकानंतर खेळ थांबवण्यात आला. चौथ्या दिवशीचा अख्खा दिवस वाया गेला. त्यामुळे आता उरलेल्या दोन दिवसांत सामन्याचा निकाल लागणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

न्यूझीलंडने तिसऱ्या दिवशी (India vs New Zealand WTC Final) दोन विकेटच्या मोबदल्यात 101 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचे दोन्ही सलामी फलंदाज तंबूत परतले आहेत. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडचा संघ अद्याप 116 धावांनी पिछाडीवर आहे. भारतीय संघानं पहिल्या डावात 217 धावा केल्या आहेत.

-चौथ्या दिवशी एकही चेंडू न खेळता दोन्ही संघावर आली लंच करण्याची

पावासामुळे चौथ्या दिवशीच्या खेळाला उशीराने सुरुवात होणार आहे. आयसीसीनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

loading image