WTC INDvsNZ : पाचव्या दिवसाअखेर भारत 2 बाद 64 धावा

IND vs NZ
IND vs NZ

ICC World Test Championship Final 2021 : न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांत आटोपल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पाचव्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी भारतीय संघाने 2 बाद 64 धावा केल्या होत्या. शुभमन गिलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. साउदीने त्याला पायचित केले. धावफलकावर अवघ्या 24 धावा असताना भारतीय संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर रोहित आणि पुजाराने भारतीय संघाच्या धावफलकावर 50 धावा लावल्या. साउदीने रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का दिला. रोहित 30 धावांवर पायचित झाला. चेतेश्वर पुजारा 12 (55) आणि कर्णधार विराट कोहली 8 (12) धावांवर खेळत होते. राखीव दिवशी सामन्यात रंगत निर्माण झाल्याचे पाहायला मिळू शकते.

मोहम्मद शमी आणि ईशांत शर्माचा भेदक मारा आणि अखेरच्या क्षणी अश्विन-जडेजाच्या फिरकीत दिसलेली जादू याच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांत आटोपला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर या जोडीने 2 बाद 101 धावांवरुन पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. 148 धावांत न्यूझीलंडने 8 विकेट गमावल्या. कर्णधार केन विल्यमसनने 49 धावा केल्या. त्यानंतर तळाच्या फलंदाजीत साउदीने 30 धाावांची उपयुक्त खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ईशांत शर्मा 3 अश्विन 2 आणि रविंद्र जडेजाला 1 विकेट मिळाली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात बुमराहला एकही विकेट मिळाली नाही.

पावासाच्या व्यत्ययामुळे विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचे जवळपास तीन दिवस वाया गेले आहेत. पहिला आणि चौथा दिवस पुर्णपणे पावसामुळे वाया गेला तर अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवशी 64 आणि तिसऱ्या दिवशी 76 षटकांचा खेळ झाला. कोसोटीचा निकाल उर्वरित दोन दिवसांवर आहे. पाचव्या दिवशीही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सामना उशीराने सुरु झाला. भारतीय वेळेनुसार चार वाजता सामन्याला सुरुवात झाली. आज दिवसभरात 91 षटकं होण्याची शक्यता बीसीसीआयने व्यक्त केली आहे .

51-2 : रोहित शर्माच्या रुपात साउदीने टीम इंडियाला आणखी एक धक्का दिलाय. तो 81 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 30 धावांची भर घालून पायिचत झाला

24-1 : शुभमन गिलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का, 8 धावांवर साउदीनं केल पायचित

रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोडीने भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली

249-10 : जडेजाने लावला साउदीच्या फटकेबाजीला ब्रेक, साउदीने 46 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 30 धावांचे उपयुक्त योगदान दिले.

234-9 : अश्विनने नील वॅगनरला खातेही उघडून दिले नाही, रहाणेने दुसऱ्या प्रयत्नात टिपला झेल

केन विल्यमसनच्या रुपात न्यूझीलंडला आठवा धक्का, 49 धावांवर ईशांत शर्माने घेतली विकेट

192-7 : मोहम्मद शमीला चौथे यश ; जेमिन्सन 16 चेंडूत 21 धावा करुन माघारी

162-6 : केन विल्यमसन आणि कॉलिन डी ग्रँडहोम जोडी फुटली, शमीने कॉलिन डी ग्रँडहोमला पायचित केले. त्याने 30 चेंडूत 13 धावा केल्या.

135-5 : मोहम्मद शमीच्या खात्यात आणखी एक विकेट, बीजे वॉटलिंगला अवघ्या एका धावेवर धाडले माघारी

134-4 : ईशांत शर्माने हेन्री निकलसच्या रुपात न्यूझीलंडचाल दिला चौथा धक्का त्याने 23 चेंडूत 7 धावा केल्या

117-3 : मोहम्मद शमीने टेलरच्या रुपात न्यूझीलंडला दिला तिसरा धक्का, शुभमन गिलने घेतला कमालीचा कॅच

पावसाचा खेळ असाच सुरु राहिला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या वहिल्या फायनलमध्ये आपल्याला भारत-न्यूझीलंड संयुक्तपणे जेतेपद मिळवताना पाहायला मिळेल.

पाचव्या दिवशीही पावासाने हजेरी लावली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com