Rupal Chaudhary : 'गावातील मुली शर्यतीत भाग घेत नाही...' आज वर्ल्ड U-20 अॅथलेटिक्समध्ये जिंकली 2 पदके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rupal Chaudhary

'गावातील मुली शर्यतीत भाग घेत नाही...' आज वर्ल्ड U-20 अॅथलेटिक्समध्ये जिंकली 2 पदके

Rupal Chaudhary World Under 20 Athletics: भारताची अॅथलीट रुपल चौधरीने जागतिक अंडर-20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचला आहे. या चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. रुपलने पहिल्या 4X400 मीटर रिले शर्यतीत रौप्यपदक जिंकले. त्यानंतर तिने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले आहे.

हेही वाचा: Ind vs WI: कर्णधार रोहित चौथा T-20 सामना खेळणार का नाही? BCCI ने स्पष्ट

रुपल चौधरीने 5 ऑगस्टला रात्री जागतिक 20 वर्षांखालील अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 4X400 मीटर रिले शर्यतीत रौप्य पदक जिंकले. भारताच्या बार्थ श्रीधर, प्रिया मोहन, कपिल आणि रुपल चौधरी यांनी 3 मिनिटे 17.76 सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि नवीन आशियाई ज्युनियर विक्रमही केला. या शर्यतीनंतर गुरुवारी रुपलने 400 मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले. रुपलने 51.85 सेकंदात शर्यत पूर्ण केली.

रूपल उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील आहे. तिचे वडिल शेती करतात. अवघ्या 17 वर्षांची असणारी रुपलने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये कमाल कामगिरी केली. तिने ज्युनियर लेवलवर राष्ट्रीय स्पर्धांमध्येही अप्रतिम खेळ दाखवला. वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्स स्पर्धेत रुपलने मिळवलेल्या यशानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रुपलचे वडील स्पोर्टस्टार बरं बोलताना सांगतात की, त्यांच्या गावातील मुली या शर्यतीत भाग घेत नाहीत. पण रुपल या निर्बंधांसह कुठे थांबणार होती, 2016 मध्ये तिने ठरवले की तिला अॅथलीट व्हायचे आहे. त्याच्या गावापासून जवळचे अॅथलेटिक्स स्टेडियम मेरठमध्ये होते. वडिलांची परवानगी मागितली पण ते मान्य नव्हते.

Web Title: World Under 20 Athletics Rupal Chaudhary First Indian To Win Two Medals Sports

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sportsAthletes