WPL 2023 : एवढा पैसा खर्च करूनही आरसीबीच्या नशिबी पराभव! कर्णधार स्मृती मानधनाचा फ्लॉप शो

WPL 2023 Delhi Capitals defeated Royal Challengers Bangalore by 60 runs Shafali Verma Meg Lanning shine Tara Norris cricket news in marathi kgm00
WPL 2023 Delhi Capitals defeated Royal Challengers Bangalore by 60 runs Shafali Verma Meg Lanning shine Tara Norris cricket news in marathi kgm00

दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीगमध्ये आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा दुसऱ्या आणि स्पर्धेतील पहिल्या सामन्यात 60 धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लिलावात स्मृती मानधनावर करोडोंचा पाऊस पडला. पण पहिल्या सामन्यात तिचा फ्लॉप शो पाहिला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 60 धावांनी जिंकला. आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 2 बाद 223 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 163 धावाच करू शकला.

WPL 2023 Delhi Capitals defeated Royal Challengers Bangalore by 60 runs Shafali Verma Meg Lanning shine Tara Norris cricket news in marathi kgm00
WPL RCB vs DC : मंधानाचा संघ पहिल्या सामन्यात पराभूत! दिल्ली कॅपिटल्सने चारली पराभवाची धूळ

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 2 बाद 223 धावा केल्या. सलामीवीर शेफाली वर्मा आणि मेग लॅनिंग यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 91 चेंडूत 162 धावांची भागीदारी केली. शेफाली 45 चेंडूत 84 धावा करून बाद झाली. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार मारले. कर्णधार मेग लॅनिंगने 43 चेंडूत 72 धावांची खेळी केली. यादरम्यान 14 चौकार मारले.

163 धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा डाव मारिजन कॅप आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 31 चेंडूत 60 धावांची नाबाद भागीदारी केली. मारिजन कॅप 17 चेंडूत 39 आणि जेमिमा रॉड्रिग्जने 15 चेंडूत 22 धावा केल्या. कॅपने तीन चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचवेळी जेमिमाने तीन चौकार मारले. आरसीबीकडून हेदर नाइटने दोन्ही विकेट घेतल्या.

WPL 2023 Delhi Capitals defeated Royal Challengers Bangalore by 60 runs Shafali Verma Meg Lanning shine Tara Norris cricket news in marathi kgm00
24 चौकार, 4 षटकार... ठोकल्या 162 धावा! शेफाली अन् कर्णधार मेग लॅनिंगचा WPLमध्ये कहर

आरसीबीच्या खेळीबद्दल बोलायचे झाले तर स्मृती मंधानाने संघासाठी सर्वाधिक 35 धावा केल्या. आरसीबीच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. पण एलिस कॅप्सीने आरसीबीला पहिला धक्का दिला. त्याने पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर सोफी डिव्हाईनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डेव्हाईनने 11 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. त्यानंतर बेंगळुरूची कर्णधार स्मृती मानधना 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्याने 23 चेंडू खेळताना पाच चौकार आणि एक षटकार ठोकला.

दिशा कासट नऊ, रिचा घोष आणि आशा शोभना प्रत्येकी दोन धावा करून बाद झाल्या. कनिका आहुजा खाते उघडू शकली नाही. प्रीती बोसने नाबाद दोन धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून अमेरिकेच्या तारा नॉरिसने सर्वाधिक 5 बळी घेतले. एलिस कॅप्सीने दोन गडी बाद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com