WPL 2023 : 14 चेंडूत ठोकल्या 64 धावा! शेफाली वर्माचे WPL मध्ये झंझावाती अर्धशतक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WPL 2023 Delhi Capitals’ Shafali Verma

WPL 2023 : 14 चेंडूत ठोकल्या 64 धावा! शेफाली वर्माचे WPL मध्ये झंझावाती अर्धशतक

WPL 2023 Delhi Capitals’ Shafali Verma : शेफाली वर्मा ही महिला क्रिकेटमधील ताबडतोड फलंदाजीसाठी ओळखली जाते. ती जेव्हा जेव्हा खेळते तेव्हा गोलंदाजांच्या मनात भीती असते. शेफालीने महिला प्रीमियर लीग मध्येही तिची तुफानी शैली दाखवली आहे.

दिल्लीचा संघ पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या जात आहे, या सामन्यात शेफालीने आपल्या बॅटची ताकद दाखवली आहे. या सामन्यात त्याने झंझावाती अर्धशतक झळकावले आहे.

या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी शेफालीने धडाकेबाज शैली दाखवून दिली. त्याने कर्णधार मेग लॅनिंगसह झंझावाती पद्धतीने धावा केल्या आणि शतकी भागीदारी केली. WPl च्या इतिहासातील ही पहिली शतकी भागीदारी आहे. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी केली.

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 2 बाद 223 धावा केल्या.

सलामीवीर शेफाली वर्मा आणि मेग लॅनिंग यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 91 चेंडूत 162 धावांची भागीदारी केली. शेफाली 45 चेंडूत 84 धावा करून बाद झाली. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार मारले. कर्णधार मेग लॅनिंगने 43 चेंडूत 72 धावांची खेळी केली. यादरम्यान 14 चौकार मारले.