WPL 2023 च्या पहिल्याच सामन्यात वादाची ठिणगी; परदेशी महिला खेळाडूकडून मोठी चूक: wpl 2023 foreign player India national anthem insulted video viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wpl 2023 foreign player India national anthem insulted video viral

WPL 2023 च्या पहिल्याच सामन्यात वादाची ठिणगी; परदेशी महिला खेळाडूकडून मोठी चूक

महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेला सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्सने मैदान चांगलेच गाजवले. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई संघाचा सामना गुजरात जायंट्सशी झाला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाने तब्बल १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये राष्ट्रगीतादरम्यान परदेशी खेळडूकडून मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.(wpl 2023 foreign player India national anthem insulted video viral)

पहिल्याच सामन्याच्या सुरुवातील परदेशी खेळाडूकडून राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचं समोर आलं आहे. गुजरात जाएंटसची टीमची कर्णधार बेथ मुनी आणि मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यामध्ये टॉस झाला.

मुनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सर्व कामगिरीनंतर धमाकेदार उद्घाटन सोहळ्यानंतर भारताच्या राष्ट्रगीताची पाळी आली होती. राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी ज्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरल्या होत्या.

जेव्हा सर्व खेळाडू भारताच्या राष्ट्रगीतासाठी उभे असताना गुजरात जायंट्सची एक खेळाडू मात्र स्तब्ध उभी नव्हती. यावेळी ती हात चोळत असताना कॅमेरामध्ये कैद झाली. मुख्य म्हणजे हा राष्ट्रगीताचा अपमान मानला जातो. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. दरम्यान भारतीय चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा पहिल्याच सामन्यात 143 धावांनी पराभव करत WPL 2023 ची दणक्यात सुरूवात केली.