यूपी वॉरियर्सचा दिप्तीवर नाही स्टार्कच्या बायकोवर भरवसा; गळ्यात घातली कॅप्टन्सीची माळ | WPL 2023 UP Warriorz Captain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WPL 2023 UP Warriorz Captain

WPL 2023 UP Warriorz Captain : यूपीचा दिप्तीवर नाही स्टार्कच्या बायकोवर भरवसा; गळ्यात घातली कॅप्टन्सीची माळ

WPL 2023 UP Warriorz Captain : महिला प्रीमियर लीग (WPL 2023) साठी अवघे दोन आठवडे राहिले असताना यूप वॉरियर्सने आपल्या कर्णधाराची निवड केली आहे. यूपीने ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हेलेची कर्णधार म्हणून घोषणा केली. सर्वांना अपेक्षा होती की भारताची अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्मा ही यूपीची कर्णधार होईल. मात्र संघ व्यवस्थापनाने अनुभवी एलिसा हेलेवर विश्वास दर्शवला.

पाचवेळा टी 20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेलेला यूपीची कर्णधार घोषित केल्यानंतर तिने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, 'ऐतिहासिक अशा WPL च्या यूपी वॉरियर्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याने मी खूप आनंदीत आहे. आम्ही WPL ची वाटच पाहत होते. यूपीचा संघ हा जबरदस्त आहे.'

एलिसा पुढे म्हणाली 'आमच्याकडे अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. या जोरावर आमच्या चाहत्यांसमोर चांगली कामगिरी करून दाखवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. निर्भीडपणे क्रिकेट खेळणे ही आमची लीगमधील ओळख असेल.'

एलिसा हेलेच्या नावावर महिला टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम आहे. तिने टी 20 वर्ल्डकपमधील श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात 148 धावा चोपल्या होत्या. याचबरोबर तिच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 5 वेळा टी 20 वर्ल्डकप जिंकला आहे. तर दोन वेळा वनडे वर्ल्डकप जिंकला. तिला 2018 मध्ये आयसीसीचा टी 20 प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!