WPL 2024 : महाराष्ट्र नव्हे तर गुजरातमध्ये होणार WPL चे सामने? BCCI सचिव जय शहा स्पष्ट बोलले

Women's Premier League 2024 in one state Jay Shah
Women's Premier League 2024 in one state Jay Shahsakal

Women's Premier League 2024 in one state Jay Shah : महिला प्रीमियर लीगसाठी शनिवारी खेळाडूंचा लिलाव पार पडला. आता या स्पर्धेच्या दुसऱ्या मोसमाचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी महिला लीगचा आगामी मोसम हा एकाच राज्यात खेळवण्यात येणार असल्याचे उद्‌गार या वेळी काढले. एका इंग्रजी दैनिकामधून याबाबतचे वृत्त समोर आले आहे.

जय शहा पुढे म्हणाले, महिला लीग २०२४मधील फेब्रुवारी महिन्यात खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या स्पर्धेला सुरुवात होईल. एकाच राज्यात संपूर्ण स्पर्धा खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे सराव, प्रवास यांसारख्या इतर छोट्या बाबींचाही त्रास होणार नाही.

आम्ही तुम्हाला सांगतो की, महिला प्रीमियर लीगचा मागील हंगाम मुंबईत खेळला गेला होता. पण यावेळी खेळला जाणार नाही अशी शकता आहे. कारण जय शहा पुढे म्हणाले की, बंगळूरू व उत्तर प्रदेश या दोन ठिकाणांसह गुजरातमध्येही या स्पर्धेच्या लढतींचे आयोजन केल्या जाऊ शकते. कारण गुजरातमध्ये अहमदाबाद, राजकोट ही दोन स्टेडियम्स आहेत. तसेच बडोद्यात आणखी एक स्टेडियम तयार होत आहे. जय शहा यांच्या बोलण्यावरून असे दिसत आहे या वेळी हा हंगाम बंगळूरू, उत्तर प्रदेश किंवा गुजरातमध्ये होऊ शकतो, महाराष्ट्रात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com