सुवर्णपदक विजेती लक्ष्मी पवार अडचणीत, ऑलिम्पिकसाठी हवीय मदत

आई, वडील आणि भाऊ यांनी तिच्या खेळण्याच्या इच्छेनुसार काबाडकष्ट करीत तिला खुराक उपलब्ध करून दिला. मात्र जशी-जशी लक्ष्मी वरच्या स्पर्धेत लक्ष्मीला खेळण्याची तयारी करावी लागली तशी आर्थिक चणचण भासू आहे.
Wrestler Laxmi Pawar
Wrestler Laxmi Pawaresakal

औसा (जि.लातूर) : आई-वडिलांची मोलमजुरी आणि भावाचे काबाडकष्ट कुस्तीत ६२ किलो गटात राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावून देशासाठी ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न बघत असलेल्या लक्ष्मी पवार (Wrestler Laxmi Pawar) ही कमी पडू लागली आहे. आतापर्यंत मोलमजुरीवर आणि लोकांनी केलेल्या मदतीवर लक्ष्मीची वाटचाल सुरू होती. मात्र आता सर्वच मार्ग बंद झाल्याने ती ऊसतोडीला जाण्यासाठी स्वतःच्या मनाला तयार करत आहे. मैदानात शड्डू ठोकून समोरच्या प्रतिस्पर्ध्याला चित करण्याची उर्मी, तर निसर्गाने लक्ष्मीला दिली. मात्र तिला या खेळासाठी लागणाऱ्या (Latur) आर्थिक पाठबळाची गरमी काढून टाकल्याने लक्ष्मीचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगण्याच्या स्थितीत आहे. औसा तालुक्यातील खानापूर तांडा या छोट्याशा तांड्यावर सीताराम पवार या मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबात लक्ष्मीने जन्म घेतला. लहानपणापासूनच लक्ष्मीला मैदानी आणि रांगड्या खेळविषयी विशेष आकर्षण होते. नियमित व्यायाम आणि मेहनतीच्या जोरावर अल्पावधीतच ती एक मल्ल म्हणून नावारूपाला आली. आई, वडील आणि भाऊ यांनी तिच्या खेळण्याच्या इच्छेनुसार काबाडकष्ट करीत तिला खुराक उपलब्ध करून दिला. (Indian Wrestler)

Wrestler Laxmi Pawar
विराट कोहली करतोय ‘बॅक एक्सटेंशन’; व्हिडिओ नक्की पाहा

मात्र जशी-जशी लक्ष्मी वरच्या स्पर्धेत लक्ष्मीला खेळण्याची तयारी करावी लागली तशी आर्थिक चणचण भासू लागली. काही लोकांनी थोडीफार आर्थिक मदतही केली. मात्र तीही तोकडीच ठरू लागली. गेल्या वर्षी मार्चमध्ये ओडिशा येथे पार पडलेल्या ६२ किलो वजनाच्या कुस्तीत तिने राष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकले आहे. तिला आता वेध लागले आहेत, ते देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे मात्र त्याची तयारी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तिची व तिच्या कुटुंबाची ऐपत नसल्याने ती उसतोडीला जाण्याच्या विचारात आहे. नियती पण कशी असते बघा समोरच्या प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याची जिद्द आणि उर्मी तर देते पण खिशाचे बळ काढून घेते. समाजातील दानशूर किंवा एखाद्या संस्थेने तिला दत्तक घेऊन मदत केली तर ती नक्कीच ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव करेल असा विश्वास तिच्या कुटूंबियांना आहे.

खरं तर कोणाकडे मदत मागण्यासाठी हात आणि मन तयार होत नाही. मनाचे ऐकत बसले तर देशासाठी खेळण्याचे स्वप्न भंगणार असल्याने मोठी घुसमट होत आहे. माझ्यासाठी कुटुंबातील लोकांना त्रास होत असल्याचे पाहून वाटतं आता बस करावे आणि आई वडिलांसोबत उसतोडीला जाऊन कुटुंबाला आर्थिक मदत करावी,

- लक्ष्मी पवार, मल्ल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com