तणावाखाली खेळतानाही निशा दहिया बनली विजेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तणावाखाली खेळतानाही निशा दहिया बनली विजेती

तणावाखाली खेळतानाही निशा दहिया बनली विजेती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंडा : भारतातील कुस्ती क्षेत्रात बुधवारी महिला कुस्तीपटूच्या हत्येवरून खळबळ उडाली. एकाच नावाच्या दोन व्यक्ती... दोघींचे क्षेत्रही एकच... याच कारणामुळे अफवाही पसरल्या. याचा फटका गोंडा येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होत असलेल्या निशा दहियाला बसला. कारण ज्या महिलेची हत्या झाली होती तिचेही नाव निशा दहिया होते अन्‌ तीही कुस्तीपटू होती. बुधवारचा संपूर्ण दिवस तणावात गेल्यानंतरही निशा दहिया हिने गुरुवारी राष्ट्रीय स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात चक्क विजेता होण्याचा मान संपादन केला.

निशा दहिया हिने जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप (२३ वर्षांखालील) या स्पर्धेमध्ये ब्राँझपदक पटकावले आहे. निशा दहिया ही राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रेल्वेचे प्रतिनिधित्व करत होती. तिने पंजाबच्या जसप्रीत कौर हिला अवघ्या ३० सेकंदांत पराभूत करीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. निशा दहिया व हरियानाची प्रियांका यांच्यामध्ये उपांत्य फेरीची लढत पार पडली. ही लढत वगळता निशा दहिया हिने प्रतिस्पर्ध्यांना सहज पराभूत केले.

"वजन कमी केल्यामुळे माझा उत्साह कमी झाला होता. त्यामध्ये निधनाच्या बातमीने आणखीनच निराशा झाले. बुधवारचा संपूर्ण दिवस तणावाखाली गेला, पण राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची सांगता विजयाने करता आली याचा आनंद आहे. माझ्यासाठी हा योग्य शेवट होता."

- निशा दहिया, विजेती

loading image
go to top