लाल मातीतच घेतला त्याने अखेरचा श्वास! पुण्यातील पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू : Wrestler passed away | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wrestler Swapnil Padale passed away

Wrestler Died In Field: लाल मातीतच घेतला त्याने अखेरचा श्वास! पुण्यातील पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू

Pune Krida News: मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान स्वप्निल ज्ञानेश्वर पाडाळे (महाराष्ट्र चॅम्पियन) याचे आज आकस्मित निधन झाले. आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत ही घटना घडली. (Wrestler Swapnil Padale passed away)

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल हा नेहमी प्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्ती साठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नील देखील व्यायाम करत होता.

व्यायाम करताना अचानक स्वप्नीलला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि अचानक तो खाली कोसळला. अचानक खाली पडल्याचे पाहताच तालमितील इतर जणांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

स्वप्नीलने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले असून, तो सध्या अनेक ठिकाणी मुलांना कुस्तीचे प्रशिक्षण देत होता.