दुबईतील पावसाचा भारतीय खेळाडूांना बसला तडाखा! ऑलिम्पिक कोटा मिळवण्याच्या आशा मिळणार धुळीस?

दुबईत झालेल्या वादळी पावसामुळे आलेल्या महापुराचा फटका भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया आणि सुजीत कालाकल यांना बसला आहे.
Wrestlers Deepak Punia Sujeet Kalakal Stranded In Dubai Airport
Wrestlers Deepak Punia Sujeet Kalakal Stranded In Dubai Airportsakal

दुबईत झालेल्या वादळी पावसामुळे आलेल्या महापुराचा फटका भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया आणि सुजीत कालाकल यांना बसला आहे. बिशकिक येथील आशिया ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी ते वेळेत जाऊच शकले नाहीत.

किर्गिस्तानची राजधानी असलेल्या बिशकिक येथे ही स्पर्धा आजपासून सुरू झाली. आजच्या पहिल्या दिवशी खेळाडूंची वजने होणार होती; परंतु पुनिया आणि कालाकल यांचे दुबईतून येथे विमान उशिरा आल्याने ते सहभागी होऊ शकले नाही.

Wrestlers Deepak Punia Sujeet Kalakal Stranded In Dubai Airport
MI vs PBKS : DRS साठी ड्रेसिंग रुममधून खाणाखुणा? मुंबई इंडियन्स संघावर गंभीर आरोप; सामन्याचा Viral Video

पुनिया आणि सुजीत यांनी कसाबसा मार्ग काढून बिशकिक येथे दाखल झाले; परंतु अनिवार्य असलेल्या वजन तपासणीसाठी ते हजर होऊ शकले नाहीत. अगोदरच तेथे दाखल झालेल्या भारतीय प्रशिक्षकांनी विनंती करूनही त्यांना वजन तपासणीत दाखल करून घेण्यास संयोजकांनी नकार दिला.

पुनिया (८६ किलो) टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवण्याच्या जवळ गेला होता. यंदा त्याच्यासह कालाकल (६५ किलो) पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याच्या आशा अधिक होत्या. या ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्यासाठी ही दुसरी सर्वात मोठी स्पर्धा आहे.

Wrestlers Deepak Punia Sujeet Kalakal Stranded In Dubai Airport
LSG vs CSK : चुकीला माफी नाही...! BCCI ने दोन्ही संघाच्या कर्णधाराकडून केली 'इतक्या' लाखांची वसुली, जाणून घ्या का?

दुबईतील पुराचा फटका पुनिया, सुजीत यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले रशियन प्रशिक्षक कामल मिल्कोव आणि फिजिओ शुभम गुप्ता यांनाही बसला. कोणत्याच सुविधा नसल्यामुळे त्यांना जमिनीवर झोपावे लागले होते.

या आशिया ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी पुनिया आणि सुजीत रशियातील दागेस्तान येथे २ ते १५ एप्रिलदरम्यान तयारी करत होते. माकांचकाल ते बिशकिक असा दुबई मार्गे त्यांचा प्रवास होता. ज्या वेळी दुबईत पावसाने हाहाकार माजवला, त्याच वेळी ते दुबईत होते.

या पात्रता स्पर्धेस मुकल्यानंतर आता त्यांच्यासमोर मे महिन्यात तुर्की येथे होणारी अखेरच्या पात्रता स्पर्धेचा पर्याय शिल्लक राहिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com