Wrestlers Protest : क्रीडा मंत्र्यांची ब्रिजभूषण सिंहांविरुध्द मोठी कारवाई; राजीनाम्याबाबत दिला 24 तासांचा अल्टिमेटम

जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट हिनं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलाय.
Wrestlers Protest Brij bhushan Sharan Singh Anurag Thakur
Wrestlers Protest Brij bhushan Sharan Singh Anurag Thakur esakal
Summary

विनेश फोगटनं ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आपल्या पदाचा गैरवापर करुन ते खेळाडूंचा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहेत, असं फोगटनं म्हटलंय.

Wrestlers Protest : दिग्गज कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचा (Indian Wrestling Federation) निषेध करत आहेत. विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक कुस्तीपटू या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट हिनं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलाय. दरम्यान, आंदोलक कुस्तीपटूंची केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

या बैठकीनंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मोठी कारवाई केलीये. त्यांनी ब्रिजभूषण सिंह यांना 24 तासांत महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितलंय. तसं न केल्यास त्यांना काढून टाकण्यात येईल, असंही सांगण्यात आलंय.

Wrestlers Protest Brij bhushan Sharan Singh Anurag Thakur
Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाला प्रियांकांचा फुल्ल सपोर्ट; म्हणाल्या, आरोपींची..

कुस्तीपटू बबिता फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि इतर अनेक कुस्तीपटूही क्रीडामंत्र्यांसोबतच्या बैठकीत सहभागी झाले होते. अनुराग ठाकूर कालच चंदीगडहून दिल्लीला पोहोचले. यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पैलवानांची बैठक घेतली. त्यावेळी ठाकूर म्हणाले, 'कुस्तीपटूंनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. भारत सरकारनं WFI ला नोटीस पाठवून 72 तासांच्या आत उत्तर मागितलंय.'

Wrestlers Protest Brij bhushan Sharan Singh Anurag Thakur
Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या भावावर मोठी जबाबदारी; 'या' पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

विनेश फोगटनं ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आपल्या पदाचा गैरवापर करुन ते खेळाडूंचा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहेत, असं फोगटनं म्हटलंय. भारतीय कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची काल सरकारशी चर्चा झाली. यानंतर विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी सांगितलं की, आम्हाला समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही, फक्त आश्वासनं मिळाली आहेत. महासंघाच्या प्रमुखांना पदावरुन हटवून तुरुंगात पाठवलं जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही. आमच्याकडं 5-6 मुली पुराव्यासह आहेत. सरकारनं कारवाई केली नाही तर आम्ही पोलिसांकडं जाऊ, असा इशाराही कुस्तीपटूंनी दिलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com